धाराशिव – शहरातील बसस्थानक ते येडशी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर आपली रिक्षा, टमटम आणि पॅगो रिक्षा यांसारखी वाहने धोकादायकरित्या उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या सहा वाहनचालकांवर आनंदनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई मंगळवारी, दि. ८ एप्रिल रोजी सकाळी १०:२० ते ११:१५ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.
पोलिसांना गस्तीदरम्यान बसस्थानक ते येडशी या सार्वजनिक रस्त्यावर सहा ठिकाणी वेगवेगळ्या चालकांनी त्यांची वाहने रहदारीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केलेली आढळून आली. यामध्ये अभिजीत दत्तात्रय कदम (वय २७, रा. मेडसिंगा, रिक्षा क्र. एमएच २५ एन १३३६), रामा संभाजी पेठे (वय ४३, रा. सांजा चौक, धाराशिव, रिक्षा क्र. एमएच २५ ए.जे. ३२०३), उमेश भिमराव पेठे (वय ३५, रा. माणिक चौक, धाराशिव, रिक्षा क्र. एमएच २५ ए.के. २२६९), नितीन हणमंत पाटील (वय ३६, रा. कुमाळवाडी, टमटम क्र. एमएच २५ ए.के. ०३४७), सुशांत शिवाजी वाघमारे (वय ३६, रा. येडशी, टमटम क्र. एमएच २५ एन ०९६५) आणि विशाल प्रकाश कतारे (वय ३१, रा. समर्थनगर, धाराशिव, पॅगो रिक्षा क्र. एमएच २५ ए.के. १४३७) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, या सहाही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी स्वतंत्र असे एकूण ६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.