उमरगा – उमरगा तालुक्यातील बालसुर येथे एसबीआय बँकेचे एटीएम फडण चोरटयांनी २७ लाख रोकड पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलसूर येथे बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, विशेष म्हणजे एका चोरट्याने हे धाडस केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलसूर येथील इंडिया बँकेच्या एटीएम मध्ये बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान तोंडावर मास्कअसलेल्या एका अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. या ठिकाणी असलेले तीन सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्याने स्प्रे करून बंद केले. त्यानंतर गॅस कटर ने एटीएम मधील कॅश बॉक्स फोडून त्यामधील २६लाख ८८ हजार रुपये लंपास केले.
दि. 25.10.2023 रोजी 02.02 ते 03.00 वा. सु. स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बलसुर येथील एटीएम चे काचेच्या उघड्या दरवाज्या मधून अनोळखी व्यक्तीने प्रवेश करुन ए.टी.एम मशीनचे कॅश वॉल्ट गॅसकटर ने कापून आतील 26,88,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश दत्तात्रय कानुरे, वय 35 वर्षे, व्यवसाय नोकरी, रा.महादेव नगर उदयगिरी कॉलेज समोर नांदेड रोड उदगीर, ता. उदगीर जि. लातुर यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि उमरगा पोलिसांची चार वेगवेगळे पथक संशयित आरोपीच्या मागावर रवाना केले आहेत.