ढोकी : आरोपी नामे- रामु कोक्या शिंदे व सोबत मयत नामे- अंजु पिंट्या काळे, वय 04 वर्षे, मंजु पिंट्या काळे, वय 6 वर्षे, रा. बुक्कनवाडी पारधी पिढी ता. जि. धाराशिव हे तिघे दि 15.10.2023 रोजी 13.00 वा. सु. उचऊ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 8598 यावरुन तेरणा साखर कारखान्याजवळ ढोकी येथे येत होते. दरम्यान रामु शिंदे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मोटरसायकल घसरुन पडल्याने या अपघातात अंजु काळे ही मयत झाली. तर. मंजु काळे व रामु शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी पिंटु बन्सी काळे, वय 33 वर्षे, रा. बुक्कनवाडी पारधी पिढी ता. जि. धाराशिव यांनी दि.02.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
टायरची चोरी
वाशी : फिर्यादी नामे- अजय सुधाकर आठवले, वय 34 वर्षे, रा. सातारा परिसर, बीड बायपास, विद्या नगर संभाजी नगर ता. जि. संभाजीनगर हे त्यांच्या मालकीचा आयशार टेम्पो मध्ये गुडईअर इंडीया लि. कंपनीचे टायर्स ज्याचा नंबर 527804 ॲण्ड 185/70 आर1488 टीव्हीएफएम 1 असा असलेला एकुण 16 टायर प्रति टायर 2,684 ₹ असा एकुण 42,944₹ किंमतीचे टायर हे दि. 31.10.2023 रोजी 01.00 ते 03.00 वा. सु. पारगाव टोलनाका ता. वाशी येथुन आयशार टेम्पो मधुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- अजय आठवले यांनी दि.02.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
कळंब : आरोपी नामे-सतिंषचंद्र भगवानदास लोढा, रा. 38/25,26 येरंउवणे प्रभात रोड लाईन नं 07, अपोझीट साईट हिराबाई बडोदेकर येरंडवणे पुणे यांनी दि. 30.06.2023 रोजी 18.45 वा. सु. दुय्यम निबंधक कर्यालय कळंब येथे दस्त क्र 1615/2021 मध्ये बनावट प्रमाणपत्र ( तलाठी कार्यालयाचे हावरगाव यांचे प्रमाणपत्र दिं.21.02.2020 चे ) दस्त मध्ये सादर करुन बनावट रेखांकन व खोटे दस्ताऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी विशाल राजेंद्र गाते, वय 28 वर्षे, व्यवसाय- प्रभारी दुय्यम निबंधक श्रेणी 1 कळंब रा.पाडोळी आ. ता. जि. धाराशिव यांनी दि.02.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 420, 467 सह नोंदणी अधिनियम कलम 82 अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.