अणदूर : बसस्थानकावर महिलांसाठी बाथरुमची सोय का केली नाही असे म्हणून एस.टी. वाहतूक नियंत्रकास मारहाण केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- छोटु बाळु घुगे, रा. अणदुर ता. तुळजापूर याने दि.30.10.2023 रोजी 15.45 वा. सु. फिर्यादी नामे- मुकूंद मनोहरराव वैद्य , वय 47 वर्षे, व्यवसाय- नोकरी – एस..टी. वाहतुक नियंत्रक ( रा. ब्राम्हण गल्ली नळदुर्ग, ता. तुळजापुर ) हे ऑफीसमध्ये त्यांचे काम करत असताना नमुद आरोपी हा आला व बसस्थानकावर महिलांसाठी बाथरुमची का सोय केली नाही असे म्हणून फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून केबीन मधून धक्का मारुन बाहेर काढून शासकिय काम काज पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन मुकूंद वैद्य यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 323अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
लोहारा :आरोपी नामे- 1)राहुल सत्यश्वर बिराजदार, 2) किरण सत्यश्वर बिराजदार, 3) सत्यश्वर शाम बिराजदार सर्व रा. जेवळी उ. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.02.11.2023 रोजी 13.00 वा. सु. जेवळी उ. शिवारतील शेत गट नं 987 मध्ये फिर्यादी नामे- आण्णासाहेब लक्ष्मण बिराजदार, वय 22 वर्षे, रा. जेवळी उ. ता. लोहारा जि. धाराशिव हे शेतात पेरणी करत असताना नमुद आरोपींनी शेत काय तुझ्या बापाचे आहे काय असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- आण्णासाहेब बिराजदार यांनी दि.02.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : आरोपी नामे- 1)गणेश सिदलिंग ठाकुर, वय 48 वर्षे, रा. किलज ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांनी दि.01.11.2023 रोजी 16.00 वा. सु. किलज शिवारातील शेतात फिर्यादी नामे- शिवाजी जिजाराम गायकवाड, वय 60 वर्षे, रा. किलज, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे जनावरांना चारा पाणी करुन त्याचे गोठ्याकडे बांधणीसाठी घेवून जात असताना नमुद आरोपी यांने दारु पिवून येवून फिर्यादीस रस्त्यात आडवून तु जनावरे माझे शेतात चारुन आणलीस का रे ? असे म्हाणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी गायकवाड यांनी दि.02.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 341, 324, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3 (1)(आर), 3(1)(एस), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे- 1)सुग्रीव अंगद गुंड, रा. बोरखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि.01.11.2023 रोजी 14.30 ते 14.45 वा. सु. बोरखेडा शिवारतील शेतात फिर्यादी नामे-संभु भानुदास गुंड, वय 90 वर्षे, रा. बोरखेडा, ता. जि. धाराशिव हे शेतात असताना नमुद आरोपी शेत बांधाचे दगड उचलण्याचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुदळीच्या तुंब्याने मारहाण गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संभु गुंड यांनी दि.02.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 325, 324, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.