धाराशिव : फिर्यादी नामे- संजय अरुण गायकवाड, वय 42 वर्षे, रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 03.11.2023 रोजी 10.00 ते 19.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा गणपती व सरस्वती दोन चांदीच्या वाट्या असा एकुण 73,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय गायकवाड यांनी दि.04.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 354,457, 380भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- विशाल नामदेव शेरकर, वय 31 वर्षे, रा. सांळुखे नगर धाराशिव ता.जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट क्लासीक मोटरसायकल क्र एमएच 25 एएच 2434, इंजिन नं U3S5C1FM070238 चेसीस नं ME3U3S5C1FIM352096 ही. दि. 01.11.2023 रोजी 23.00 ते दि. 02.11.2023 रोजी 07.00 वा. सु. विशाल माने यांचे राहाते घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी-विशाल शेरकर यांनी दि.04.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे- अल्का बाबु पवार, वय 54 वर्षे, रा. शास्त्रीनगर उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 04.11.2023 रोजी 12.30 ते 15.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50,000₹ असा एकुण 74,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- अल्का पवार यांनी दि.04.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 454, 380भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.