नळदुर्ग : दि.13.10.2023 रोजी 02.20 ते 03.00 वा. सु. मोरे कॉम्प्लेक्स, सोलापूर उमरगा रोड नळदुर्ग येथे स्टेट बॅक एटीएम हे अज्ञात व्यक्तीने गॅस कटरच्या साहाय्याने फोडून संपुर्ण एटीएम मशीनचे नुकसान करुन त्यामधुन 1,22,800₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- भिकाजी संभाजी लिमकर, वय 42 वर्षे, व्यवसाय- एफ एस एस कंपनी मध्ये असीस्टंट मॅनेजर रा. मु. पो. उंचगाव, ता. करवीर जि. कोल्हापूर यांनी दि.14.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 380, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- आमृता राहुल पाटवदकर, वय 34 वर्षे, रा. वैभवनगर गणेश मंदीराचे पाठीमागे श्री शाळेजवळ लातुर ता. जि. लातुर या दि. 13.10.2023 रोजी 15.30 वा. सु. ढोकी पे पंप चौकातुन कळंब सोलापूर बस मध्ये चढत असताना आमृता पाटवदकर यांचे पर्स मधील अंदाजे 10,000₹ रोक रक्कम ही अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- आमृता पाटवदकर यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
मुरुम : आरेापी नामे- 1)शितल प्रभाकर शिंदे, 2) बालाजी तुकाराम जोमदे, 3) प्रभाकर मारुती शिंदे सर्व रा. चिंचोली भुयार ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 13.09.2022 रोजी 13.00 ते 17.00 वा. दरम्यानफिर्यादी नामे- शकुंतला दगडू गायकवाड, वय 55 वर्षे, रा. चिंचोली भुयार, ता. उमरगा जि. धाराशिव यांचे नमुद अरोपी यांनी फिर्यादीचे मयत पती दगडू साधु गायकवाड यांचे नावे 100 ₹ चे स्टॅम्प खरेदी करुन त्यावर फिर्यादी यांचे बनावट स्वाक्षरी व अंगठा करुन बनावट दस्तऐवज तयार करुन दगडू साधू गायकवाड यांचे नावे असलेला ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली भुयार हद्दीतील प्लॉट नं 872 हा आरोपी क्र 1 हिचे नावावर करुन शकुंतला गायकवाड यांची फसवणु केली. अशा मजकुराच्या शकुंतला गायकवाड यांनी दि.14.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 465, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
मुरुम :आरेापी नामे- 1) राजेंद्र सिद्राम माळी, 2) पुतळाबाई सिद्राम माळी दोघे रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 14.10.2023 रोजी 10.00 वा. सु. आलुर शिवारातील शेताचे बांधावर फिर्यादी नामे- मल्लम्मा कशीनाथ माळी, वय 50 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव, यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी विळ्याने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे पती काशीनाथ माळी हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तुम्ही सोयाबीन काढायचे नाही असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मल्लम्मा माळी यांनी दि.14.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.