धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस दलातून पदच्युत करण्यात आलेल्या नानासाहेब भानुदास भोसले याच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
सोयाबीन आणि इतर मालाला व्यापाऱ्यापेक्षा जास्त भाव देतो म्हणून पोलीस दलातून पदच्युत करण्यात आलेल्या नानासाहेब भानुदास भोसले याने बेंबळी, रुईभर आदी गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल घेऊन फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा आकडा ५० लाखाच्या घरात आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, पण भोसले यास पोलीस अटक करीत नव्हते. न्यायालयाने जामीन फेटाळून देखील भोसले मोकाट होता. अखेर भोसले यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर आता धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी नामे-नानासाहेब भानुदास भोसले, रा. बॅक कॉलनी धाराशिव ता.जि. धाराशिव यांनी दि. 07.04.2021 रोजी पसून ते आज पावेतो फिर्यादी नामे- समाधान शिवाजी भोसले, वय 40 वर्षे, रा. गावसुद ता. जि. धाराशिव यांची 80 क्विंटल ज्वारी, तसेच रामहरी नागनाथ एडके, रा. गावसुद यांचे 70 क्विंटल, तसेख् सतिश बुबासाहेब भोसले, यांचे 67 क्विंटल ज्वारी, 13 क्विंटल हरभरा असा एकुण 7, 65, 050 ₹ किंमतीचा माल विश्वासात घेवून आजपर्यंत सदरची रक्कम न देता फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे समाधान शिवाजी भोसले, वय 40 वर्षे, रा. गावसुद ता. जि. धाराशिव यांनी दि.31.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 406, 420, 417 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.