धाराशिव – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या धाराशिव जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. आनंदनगर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बीडला बदली करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत,. लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या धाराशिव जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत.
आनंदनगर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची बीडला बदली करण्यात आली आहे. बांगर यांनी धाराशिव पालिका घोटाळ्यात अडकलेल्या आरोपीना पाठीशी घातल्याचा आरोप आहे. त्यांची मागेच पोलीस मुख्यालयात उचलबांगडी होणार होती. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबाहेर बदली होणार असल्याने त्यांना एक महिना मुदतवाढ देण्यात आली, पण त्याना मुख्यालयाची कामे लावण्यात आली होती.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे अशी ,