वाशी – वाशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठवण्यासाठी एका इसमाकडून दोन हजाराची लाच घेताना दोन पोलिसाना एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले असून, याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1. तानाजी त्रिंबक तांबे , वय 28 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 260, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव *( वर्ग -3-)* 2. रणजित अनिल कासारे, वय 31 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 514, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव *( वर्ग -3-) 3. पवन राजेंद्र हिंगमिरे, वय 26 वर्षे, रा. झिन्नर, ता. वाशी, ज़ि. धाराशिव *( खाजगी ईसम ) अशी आरोपीची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांचेविरुद्ध वाशी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये यातील आरोपी क्रमांक १ यांनी यातील तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर / किरकोळ कारवाई करण्यासाठी मी बिट अंमलदार यांना सांगितले होते त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठविला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांचे पत्नीस समजावून सांगून सदरची तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक १ यांनी आरोपी क्रमांक ०२ यांचेकरवी पंचा समक्ष २०००/-रुपये लाचेची मागणी केली. सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक ०१ याने लाचेची रक्कम खाजगी इसम आरोपी क्रमांक ०३ यांच्याकडे देण्यास सांगितले असता आरोपी क्रमांक ३ यांनी सदर २०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर ०२ आरोपी लोकसेवक व ०१ खाजगी इसम यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
हा सापळा पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर , अविनाश आचार्य यांची रचला होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा* कार्यालय 02472 222879* टोल फ्री क्रमांक.1064 असे आवाहन करण्यात आले आहे.