• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सव्वादोन लाखांच्या गोवंशीय जनावरांची सुटका

धाराशिव शहर पोलिसांची धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल

admin by admin
March 21, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
47
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शहरातील खिरणीमळा भागात कत्तलीच्या उद्देशाने चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची शहर पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख १७ हजार रुपये किमतीची जनावरे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी एका तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १९) रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील खिरणीमळा परिसरात काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी तिथे गोवंशीय जातीची १० कालवड, वासरू व खोंड आणि एक जर्सी गाय अशी एकूण ११ जनावरे आढळून आली. या जनावरांना चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयीपणे आणि बेकायदेशीररीत्या बांधून ठेवले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख १७ हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. या प्रकरणी मुसाविर मतीन कुरेशी (वय २५, रा. आझाद चौक, कुरेशी गल्ली, धाराशिव) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी सरकारतर्फे शहर पोलिसांनी मुसाविर कुरेशी याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम कलम ११ (१) (ब), तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम ५ (अ) अन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.


Previous Post

१० कोटींचे ड्रग्ज सापडले, पण आरोपी फरार! नळदुर्ग पोलिसांच्या ‘नाकेबंदीवरच’ मोठे प्रश्नचिन्ह?

Next Post

शेकापूर शिवारात साडेनऊ लाखांच्या विद्युत केबलची चोरी

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेकापूर शिवारात साडेनऊ लाखांच्या विद्युत केबलची चोरी

ताज्या बातम्या

बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

पुतळा व जयंतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

March 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेकापूर शिवारात साडेनऊ लाखांच्या विद्युत केबलची चोरी

March 21, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सव्वादोन लाखांच्या गोवंशीय जनावरांची सुटका

March 21, 2026
धाराशिव ब्रेकिंग: नळदुर्ग-तुळजापूर महामार्गावर १० कोटींच्या अमली पदार्थांची संशयित बॅग जप्त; दोन आरोपी फरार

१० कोटींचे ड्रग्ज सापडले, पण आरोपी फरार! नळदुर्ग पोलिसांच्या ‘नाकेबंदीवरच’ मोठे प्रश्नचिन्ह?

March 21, 2026
तुळजापुरातील अवैध धंदे तत्काळ बंद करा; अन्यथा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

राणा पाटील, आता सांगा तुळजापूरची बदनामी नक्की कोण करतंय?

March 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group