धाराशिव : रात्रगस्त पेट्रोलींग दरम्यान आनंदनगर पोलीसांना दि. 25.05.2024 रोजी 01.00 वा. सु.अंबाला एमआयडीसी परिसर धाराशिव येथे आरोपी नामे- 1)राहुल राजु राठोड, वय 32 वर्षे, रा. सेवालाल कॉलनी तेरणा कॉलनी धाराशिव, 2) शेख सोहेल रफिक, वय 24 रा. जुना बस डेपो धाराशिव, 3) किरण गोविंद लोहार, वय 24 वर्षे, रा. देशापांडे स्टॅण्ड धाराशिव, 4) सागर विठ्ठल कांबळे, वय 29 रा. इंदीरानगर धराशिव, 5) विधी संघर्ष बालक हे काठी व धारधार शस्त्रासह दरोडा घालण्याच्या तयारीनिशी मिळून आले. पोलीसांची चाहुल लागताच मोटार सायकल सह पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने नमुद इसमांना काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल क्र एमएच 01 बीजे 6801 व विना नंबरची टीव्हीएस रोडीओऑन कंपनीची गाडी सह पथकाने त्यास पकडले. अशा मजकुराच्या गोरक्षनाथ बबन पालवे, वय 57 वर्षे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणुक आनंदनगर पोलीस ठाणे यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 399 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे पाच गुन्हे दाखल
धाराशिव : फिर्यादी नामे-रमेश रावसाहेब दुधे, वय 42 वर्षे, रा. लिंबोणी बाग 21 नंबर शाळेजवळ तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 23.05.2024 रोजी 11.00 ते दि. 24.05.2024 रोजी 19.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी पेटीतील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 35,000₹ असा एकुण 72, 500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या रमेश दुधे यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : दि. 21.05.2024 रोजी 17.00 ते दि. 22.05.2024 रोजी 08.30 वा. सु. प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी उपकेंद्र शिंगोली येथील टेक्सो कंपनीची विद्युत मोटार व केबल 270 फुट असा एकुण 27, 042₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फुलाबाई बाबु कोळी, वय 51 वर्षे, व्यवसाय आरोग्य सेविका रा. वडगाव ह.मु. शिंगेली ता. जि. धाराशिव यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-बालाजी विष्णु मगर, वय 34 वर्षे, रा. खानापुर ता. जि. धाराशिव ह.मु. जिजाउ चौक मातोश्री बिर्याणी सेंटर समोर धाराशिव यांचा अंदाजे 7,000₹ किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल हा दि. 22.05.2024 रोजी 06.30 वा. सु. जिजाउ चौक मातोश्री बिर्याणी सेंटर समोर धाराशिव अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालाजी मगर यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-संजय बन्सीधर आखाडे, वय 39 वर्षे, रा. तुळजाई नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 31,000₹ किंमतीची लाल रंगाची हिरो कंपनीची मॅस्ट्रो स्कुटी क्र एमएच 25 एआर 8146 जिचा इंजिन नं JF33ABKGB04202 व चेसी नं MBLJFW016 KGB04844 ही दि. 12.05.2024 रोजी 14.30 ते दि. 14.05.2024 रोजी 14.30 वा. सु. संजय आखाडे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय आखाडे यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-प्रियदर्शनी प्रभाकर कांबळे, वय 29 वर्षे रा. बाबानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि. 25.03.2024 रोजी 18.00 वा. सु. आठवडी बाजार मैदान कळंब येथे बाजार करत असताना अज्ञात व्यक्तीने प्रियदर्शनी कांबळे यांच्या पर्स मधील ओपो कंपनीचा मोबाईल अंदाजे 6,000₹ किंमतीचा चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रियदर्शनी कांबळे यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.