• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात पोलिसांचा रूट मार्च

 नागरिकांना सुरक्षिततेची ग्वाही

admin by admin
April 5, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात पोलिसांचा रूट मार्च
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  आगामी काळात साजरे होणारे रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती या महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनिवारी (दि. ५ एप्रिल) पोलिसांकडून विशेष रूट मार्च आणि पेट्रोलिंगचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पोलिसांनी हा उपक्रम राबवला.

शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित वाटावे, या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला. आनंदनगर पोलीस स्टेशन येथून या रूट मार्चला सुरुवात झाली. पुढे सेंट्रल बिल्डींग चौक, महात्मा बस्वेश्वर चौक, माणिक चौक, जिजाऊ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मार्चाचा समारोप करण्यात आला.

या रूट मार्च आणि पेट्रोलिंगमध्ये ४ पोलीस अधिकारी, ३० पोलीस अंमलदार आणि १० होमगार्ड यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या उपस्थितीमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर सुरक्षा आणि शिस्तीचे दर्शन घडले. या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली.

पोलिसांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या रूट मार्चमुळे शहरात सणासुदीच्या उत्साहासोबतच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.

Previous Post

कळंब बस स्थानकात तरुणीच्या बॅगेतून १.४० लाखांचे दागिने लंपास

Next Post

शेतजमिनीतून बेकायदा माती उत्खनन?

Next Post
शेतजमिनीतून बेकायदा माती उत्खनन?

शेतजमिनीतून बेकायदा माती उत्खनन?

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!