• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईला जाणारा सव्वा लाखांचा गांजा जप्त

admin by admin
June 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईला जाणारा सव्वा लाखांचा गांजा जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  मुंबई येथे विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल १ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. येडशी येथील ट्रॅव्हल पॉईंटवर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ८.२७ किलो गांजासह एका व्यक्तीला अटक केली आहे. वसंत भालचंद्र शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक गुरुवारी (दि. १२ जून) मध्यरात्री ००:०५ वाजताच्या सुमारास धाराशिव उपविभागात गस्त घालत होते.

गस्तीदरम्यान, येडशी येथील हॉटेल समाधान समोरील ट्रॅव्हल पॉईंटवर एक व्यक्ती काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पदरीत्या थांबलेली दिसली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने बॅगेत गांजा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून बॅगेची तपासणी केली असता, त्यात ८.२७ किलो वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची किंमत १,६५,४०० रुपये आहे.

पोलिसांनी आरोपी वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी, ता.जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सांगितले की, तो हा गांजा ढोकी येथून ट्रॅव्हल्सने मुंबईला विक्रीसाठी घेऊन जात होता. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) कलम ८(क), २०(ब)(२)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.

Previous Post

धाराशिवच्या रस्त्यांवर राजकीय भूकंप: पालकमंत्र्यांच्या ‘मास्टरस्ट्रोक’ने २२ कोटींच्या वादावर पडदा; कंत्राट रद्द!

Next Post

परंडा पोलिसांची मोठी कारवाई, कत्तलीसाठी जाणारी ६ गोवंश जनावरे ताब्यात; ६.४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा पोलिसांची मोठी कारवाई, कत्तलीसाठी जाणारी ६ गोवंश जनावरे ताब्यात; ६.४ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!