वाशी : फिर्यादी नामे-मेघश्याम मोहन तारी, वय 43 वर्षे, रा.बांधा ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग, हे त्यांचे ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हल्स क्र जी.ए.03 वाय 9983 ही पार्डी फाटा पेट्रोलपंप येथे उभी करुन झोपले असता दि. 03.12.2023 रोजी 04.10 ते 05.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने गाडीत ठेवलेले 1) रियल मी कंपनीचा मोबाईल, 2) धिरज रोहीदास सेट यांचा रेड मी कंपीनचा नोट 9 प्रो मॅक्स कंपनीचा मोबाईल, 3) अनिल हरिश्चंद्र भोसले यांचे पर्स मधील रोख रक्कम 8,000₹ इंम्पोटेड गॉगल, 4) गजानन नाईक यांचा वन प्लस मोबाईल निळ्या रंगाचा असा एकुण 45,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मेघश्याम तारी यांनी दि.03.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे- रतनसिंग दलपतसिंग, वय 45 वर्षे, रा. हलसोंड चेरगट, जि. जोधपूर, राज्य राजस्थान हे ट्रक नंबर जीजे 27 टीटी 8660 मध्ये दिल्ली राज्यस्थान ट्रान्सपोर्ट कंपनीचे 10 टायर घेवून कोईमत्तुर तामीळनाडू ते गुजरात एनएच 52 हायवे रोडने जात असताना तेरखेडा गावाजवळील ब्रिजचे पुढे एचपी पेट्रोपंपासमोर दोन अनोळखी इसमांनी चालत्या गाडीची ताडपत्री फाडून गाडीतील माल चोरी करण्याचा प्रयत्न केला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रतनसिंग दलपतसिंग यांनी दि.03.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379, 511, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
वाशी : आरोपी नामे- 1) सिध्देश्वर सदाशिव लिमकर, 2) उध्दव वसंत लिमकर, 3) तात्यासाहेब प्रल्हाद लिमकर रा.आंद्रुड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.27.11.2023 रोजी 11.30 वा. सु. आंद्रुड येथील भरत भोईटे यांचे शेताजवळ फिर्यादी नामे-देविदास भिमराव गिते, वय 38 वर्षे, व्यवसाय- नोकरी रा.आंद्रुड ता. भुम जि. धाराशिव हे आंद्रुड ग्रामपंचायत नळ योजनेची जानु निवृत्ती लिमकर यांचे वस्तीस पाणी पुरवठा करणारी पाईपलाईने काम करीत असताना नमुद आरोपींनी काम बंद पाडून फिर्यादीस शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- देविदास गिते यांनी दि.03.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 353, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.