• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, January 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या विकासाचा ‘येळकोट’ आणि राजकारणाचा ‘धुरळा’!

admin by admin
June 21, 2025
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
धाराशिवच्या विकासाचा ‘येळकोट’ आणि राजकारणाचा ‘धुरळा’!
0
SHARES
335
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

पात्रं:

  • भावड्या: गावाच्या पारावर बसून दिवसभर राजकारणाचा किस पाडणारा एक उत्साही तरुण.
  • पक्या: प्रत्येक गोष्टीत विनोदाचा कोन शोधणारा, हजरजबाबी आणि थोडासा वैतागलेला गडी.
  • पेंद्या: सगळ्यांच्या बोलण्यात होss ला होss करणारा, पण मनातल्या मनात सगळं समजणारा एक भोळाभाबडा माणूस.

(गावाच्या पारावर बसून तिघेही चकाट्या पिटत आहेत. समोरून एक आलिशान गाडी धुळ उडवत निघून जाते.)

भावड्या: (डोळ्यावर आलेली धूळ झटकत) आरं आरं… बघा रं… आपल्या आमदारांची गाडी गेली. काय थाट हाय बघा…दादा पालकमंत्री नसले म्हणजे काय झालं, थाट बघा ..

पेंद्या – डॉक्टर साहेबानी सात नव्हँ दहा पिढ्या बसून खाल्लं तरी इतकं कमवून ठेवलंय , आता दादांना पैशाची गरज नाय.. फकस्त जिल्ह्याचा विकास करायचा म्हणत्यात…

पक्या: (तोंड वाकडं करत) कसला विकास ? अन कसला काय ? आपल्या जिल्ह्याचा देशात तिसरा नंबर लागतोय, पण कशात? तर मागासलेपणात! ह्यास्नी काय लाज-बिजा वाटती का न्हाई?

पेंद्या: (भोळेपणाने) पन भावड्या, विकास करायचा म्हनून तर राष्ट्रवादीतुन भाजपमध्ये गेले की ते…

भावड्या: आरं पेंद्या… खुळ्या रं तू! विकास? कसला आलाय विकास? अजितदादांना सांगून जिल्ह्याच्या २६८ कोटींच्या कामाला स्थगिती आणली. आता आपले पालकमंत्री सरनाईक अन् हे… दोघं मिळून ‘तू तू – मैं मैं’ खेळायला लागलेत. सरनाईकांनी बी शहरातील १४० कोटींच्या रस्त्याच्या टेंडरला केराची टोपली दावली. ह्यांच्या भांडणात आपलाच बोकांडी बसतोय.

पक्या: मंग काय तर! ह्यांची सुंदोपसुंदी म्हणजे, एकानं माळा घालायचा, दुसऱ्यानं तोडायचा. अन् आपण फक्त ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ करत बसायचं.

पेंद्या: पन ते एमआयडीसीचं काय झालं? कौडगावला लय मोठी कंपनी येणार होती म्हनं?

भावड्या: (हताशपणे हसतो) अरे पेंद्या, १२ वरिसं झाली रं त्या गोष्टीला. आधी म्हणले लेदर पार्क आणतोय, आता म्हणत्यात टेक्सटाईल पार्क आणतोय. तिथं नुसतं कुसळी गवत वाढलंय रं पार गुडघाभर! निवडणूक आली की ह्यास्नी टेक्सटाईल पार्कचं गाजर आठवतंय. जसं काय आपण काय येडेच हायेत!

पक्या: (डोळा मारत) आरं, ते गाजर न्हाई, ते गाजराचं ह्ये हाय… काय म्हणत्यात ते… मृगजळ! दुरून दिसतंय पाणी हाय, जवळ गेल्यावर नुसती वाळूच! आता नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक लागलीया… बघाच आता, रोज एक नवीन घोषणा होणार. ‘धाराशिवला सिंगापूर बनवणार’, ‘प्रत्येकाच्या घरात नळाला सोनं येणार’…

पेंद्या: (आश्चर्यचकित होऊन) खरंच? नळाला सोनं?

भावड्या: (कपाळावर हात मारून) आरं देवा… पेंद्या, अरे तो पक्या गंमत करतोय. ह्यांच्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, त्या लांब गेलेल्या गाडीच्या धुळीवर ठेवलेला बरा. निदान धूळ तरी खाली बसतीया… ह्यांच्या घोषणा काय बसत न्हाईत!

पक्या: जाऊ द्या रं पोरांनो… लय डोक्याला ताण देऊ नका. आपल्या नशिबात विकास कमी अन् राजकारणाचा धुरळाच जास्त हाय. चला, च्या प्यायला. निदान तेवढा तरी विकास आपल्या घशातून पोटात जाईल!

(तिघेही हसत हसत चहाच्या टपरीकडे निघून जातात.)

Previous Post

धाराशिव शहरातील आयुर्वेदिक कॉलनीत घरफोडी; सोने-चांदीसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

Next Post

धाराशिवच्या डॉक्टर गिलबिलेला १२ लाखांस फसवलं

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवच्या डॉक्टर गिलबिलेला १२ लाखांस फसवलं

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

रस्ता मागितल्याच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण

January 25, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिवमध्ये पतीनेच मारला पत्नीच्या दागिन्यांवर डल्ला; जाब विचारताच बेदम मारहाण

January 25, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

 विश्वासघात! ग्रील बसविण्यासाठी आलेल्या कामगारांनीच लांबवले ९१ हजारांचे सोन्याचे दागिने

January 25, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून १९ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; देवसिंगा येथील घटना, पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

January 25, 2026
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा राडा; शिंदे गटाच्या तिकीट वाटपावरून शिवसैनिक आक्रमक, पालकमंत्र्यांना घेराव!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा राडा; शिंदे गटाच्या तिकीट वाटपावरून शिवसैनिक आक्रमक, पालकमंत्र्यांना घेराव!

January 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group