धाराशिव: येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.
सरनाईक यांनी केलेल्या घोषणा:
- जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडींसाठी १००% स्वतःची इमारत बांधण्यात येणार आहे.
- जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत.
- शेतकऱ्यांना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्पुरती मदत म्हणून ‘पॉवर ऑन व्हिल’ (मोबाइल ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- धाराशिव शहर, तुळजापूर शहर, उमरगा शहर या ठिकाणी गुन्हेगारी व सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
- तुळजापूर येथे १५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. हे रुग्णालय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर व महात्मा फुले जन आरोग्य योजना, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १२४ भक्त निवास या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
या घोषणांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.