• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 24, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये रस्ते कामांना हिरवा कंदील: अंदाजपत्रकीय दरानेच निविदा मंजूर, २२ कोटींची बचत

admin by admin
May 24, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
0
SHARES
307
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव शहरातील सुमारे वर्षभरापासून रखडलेल्या १४० कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा (५९ डीपी रस्ते) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यस्तरीय समितीने ही कामे अंदाजपत्रकीय दरानेच करण्यास मंजुरी दिल्याने पालिकेचे म्हणजेच पर्यायाने जनतेचे तब्बल २२ कोटी रुपये वाचणार आहेत. महाविकास आघाडीच्या सततच्या पाठपुराव्याला आणि पालकमंत्री यांच्या यशस्वी मध्यस्थीला यश आले असून, कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिली.

या कामांसाठी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र, निविदा प्रक्रिया अंदाजपत्रकीय दरापेक्षा १५ टक्के अधिक दराने असल्याने काम सुरू होऊ शकले नव्हते. या विलंबाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शहरप्रमुख सोमनाथ गुरव, रवी वाघमारे व सरफराज काझी यांनी २८ मे २०२४ रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पालकमंत्री यांनी मध्यस्थी करून दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचे पालन करत, प्रशासनाने कंत्राटदाराशी अंदाजपत्रकीय दराने काम करण्याबाबत वाटाघाटी केल्या. तसेच, २ मे रोजी नगर परिषद संचालनालयाच्या मुख्याधिकाऱ्यांनीही ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. अखेरीस, शुक्रवारी (२३ मे २०२५) मुंबईत प्रधान सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित गुत्तेदाराने ही कामे अंदाजपत्रकीय दराने करण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे आता कामे सुरू होण्याचा मोठा अडथळा दूर झाला आहे.

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना सोमनाथ गुरव म्हणाले, “नगरपालिकेचा २५ टक्के लोकवाटा (सुमारे ३५ कोटी रुपये) या कामांसाठी अगोदरच मंजूर आहे. याव्यतिरिक्त, अंदाजपत्रकीय दरापेक्षा १५ टक्के अधिक दरामुळे पालिकेवर सुमारे २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार होता, जो नागरिकांच्याच खिशातून गेला असता. या निर्णयामुळे हे पैसे वाचले आहेत, याचे समाधान आहे.”

गुरव यांनी पुढे मागणी केली की, “पावसाळा तोंडावर असला तरी सिमेंट रस्त्यांच्या कामांना फारशी अडचण येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता तात्काळ कार्यारंभ आदेश (work order) देऊन गुत्तेदाराकडून ही कामे तातडीने सुरू करावीत, जेणेकरून धाराशिव शहरातील जनतेला दिलासा मिळेल.” या निर्णयामुळे शहरातील विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना खतांची सक्तीने विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार

Next Post

धाराशिवच्या रस्त्यांचा ‘अ‍ॅपल’ की ‘रेडमी’ घोळ? २२ कोटी वाचले, पण श्रेयवादाच्या ‘रिंगटोन’ने कान किटले!

Next Post
व्वा रे धाराशिवकर! रस्ते झालेत ‘वेटिंग’वर, नेते मात्र ‘क्रेडिट’साठी लागलेत फाईटिंगवर!

धाराशिवच्या रस्त्यांचा ‘अ‍ॅपल’ की ‘रेडमी’ घोळ? २२ कोटी वाचले, पण श्रेयवादाच्या ‘रिंगटोन’ने कान किटले!

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

June 24, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

June 24, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, नळदुर्ग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

June 24, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group