धाराशिव : धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटनांपैकी एका घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोठा जमाव थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आहे.
आरोपी नामे-केशव महादेव हराळे, महादेव रावण हराळे, वैष्णवी केशव हराळे, सहदेव प्रभु हराळे, राजुबाई महादेव हराळे, हणुमंत शहाजी हराळे सर्व रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांनी दि.02.02.2025 रोजी 12.00 वा. सु. सुग्रीव बाबु थोरात यांचे घरासमोर घाटंग्री येथे फिर्यादी नामे- कल्पना दिलीप हराळे, वय 40 वर्षे, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांचे सासरे नामे एकनाथ भिमा हराळे यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉड, काठी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कल्पना हराळे यांनी दि.03.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 118(1) 115(2), 352, 189(2),191(1), 191(3), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आरोपी नामे-बंटी राठोड, अनिल राठोड दोघे रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांनी दि.03.02.2025 रोजी 07.45 वा. सु. बंटी राठोड यांचे टपरी जवळ सेवालाल चौक घाटंग्री येथे फिर्यादी नामे- कुसूम गोरख कांबळे, वय 45 वर्षे, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांचा मुलगा गोविंद कांबळे यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कुसुम कांबळे यांनी दि.03.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1) 115(2), 351(2)(3), 352, 3(5) सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(1)(आर), 3(1) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटनांपैकी एका घटनेत गंभीर जखमी झालेल्या एकनाथ भीमा हराळे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोठा जमाव थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आहे.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मोठा जमाव जमवला आहे. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. मृतदेह अँम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आला असून, पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.
पोलिसांकडून पुढील कारवाईची तयारी
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींवर आधीच गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत, मात्र आता मृत्यू झाल्याने अतिरिक्त कलमे लावली जातील का, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी निर्णय घेणार आहेत.
या प्रकरणातील पुढील अपडेट्स लवकरच मिळतील.