धाराशिव – लग्नानंतर अवघ्या एक वर्षात सासरा वाईट नरजेने पाहू लागल्यामुळे आणि दारू पिऊन अश्लील शिवीगाळ केल्यामुळे एका सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सारोळा येथे घडली.
मयत नामे-जयश्री किरण वडलीक, वय 21 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी सायंकाळी 08.00 ते रात्री 11.00 वा. सु. त्यांचे राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- पांडुरंग भिमा वडलीक रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव हे नात्याने मयत जयश्री वडलीक यांचा सासरा असुन यातील नमुद आरोपीने मयत जयश्री वडलीक यांचे कडे वाईट नजरेने बघत होता व दारु पिवून येवून मयत यांना घाण घाण शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून जयश्री वडलीक यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई- अंजना मनोज साठे, वय 31 वर्षे, रा. क्रांतीनगर सरकारी दवाखान्याचे पाठीमागे अंबेजोगाई ता. अंबेजोगाई जि. बीड ह.मु. संतोष मुंढे यांचे शेतात झोला रोड गंगाखेड ता.जि. परभणी यांनी दि. 15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.