• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : शशिकला शेरखाने यांच्या घरफोडीतील आरोपी निघाला शेजारी !

admin by admin
December 15, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : शशिकला शेरखाने यांच्या घरफोडीतील आरोपी निघाला शेजारी !
0
SHARES
4.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव शहरातील सांजा रोडवरील पद्मसिंहनगर येथे राहणाऱ्या शशिकला सुरेश शेरखाने यांच्या घरी गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री घरफोडी झाली होती. त्यात चोरट्यांनी घरातील १० तोळे सोने, ७० हजार रुपये रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू लंपास केल्या होत्या. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत 3 लाख 9 हजार रुपये इतकी होती.

याप्रकरणी शशिकला सुरेश शेरखाने यांनी आनंदनगर, धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करून, संशयित आरोपी म्हणून शेजारी राहणाऱ्या अविनाश शिवाजी जगदाळे याचे नाव दिले होते. त्यादिवशी आरोपीच्या घरासमोरील सर्व सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे संशय वाढला होता.

फिर्याद दाखल होताच, आनंदनगर, धाराशिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि  चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शेजारी रहाणाऱ्या अविनाश शिवाजी जगदाळे याचे नाव संशयित असतानाही पोलीस त्याला अटक करीत नव्हते.

अखेर १२ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी अविनाश शिवाजी जगदाळे यास राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात भोपळा; तानाजी सावंत डच्चू, राणा जगजितसिंह यांनाही निराशा

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचा नागपुरात महाविस्तार : नाईक सर्वात ज्येष्ठ, अदिती सर्वात तरुण

Next Post
राज्य मंत्रिमंडळाचा नागपुरात महाविस्तार : नाईक सर्वात ज्येष्ठ, अदिती सर्वात तरुण

राज्य मंत्रिमंडळाचा नागपुरात महाविस्तार : नाईक सर्वात ज्येष्ठ, अदिती सर्वात तरुण

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!