धाराशिव – धाराशिव शहरातील विविध विकास योजनांतर्गत मंजूर असलेल्या रस्त्यांच्या कामांचा तात्काळ पूर्ण करण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने इशारा दिला आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलफेक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भुयारी गटार योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामामुळे रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे, ज्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या योजनेसाठी जवळपास 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळानंतर सत्ताधारी सरकारने विकासकामांवर स्थगिती आणल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. तसेच, शहरातील 60 टक्के पथदिवे बंद असल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
शिवसेना पक्षाने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. कामे वेळेत पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने चिखलफेक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मा. जिल्हाप्रमुख भारत इंगळे, मा. नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, दत्ता बंडगर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव,प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, प्रशांत साळुंके, बंडू आदरकर, पंकज पाटील, सिध्देश्वर कोळी, गणेश खोचरे, तुषार निंबाळकर, अफरोज पिरजादे, गणेश असलेकर, राणा बनसोडे, सुरेश गवळी, पांडू भोसले, हनुमंत देवकते, अभिराज कदम, सुमित बागल, गणेश साळुंके, मुजीब काझी,साबेर सय्यद, अभिजीत देशमुख, अमित उंबरे, नाना घाटगे, अमित जगधने, गणेश राजेनिबाळकर, प्रसाद पाटील, महेंद्र शिंदे, कालिदास शेरकर, छोटा साजीद, सह्याद्री राजेनिंबाळकर, शिवराज आचार्य, हर्षद ठवरे, अनुज कुदाळ, ओंकार बांगर, यशवंत शहापालक, प्रशांत जगताप, वैभव पाटील, योगेश गरड, प्रसाद राजे, बप्पा कसबे, शिवयोगी चपणे, कलीम कुरेशी, रोहन महाडिक, गणेश मुंडसे आदिंची स्वाक्षरी आहे.