धाराशिव – तालुक्यातील महाळगी येथे शिवसेनेचे प्रशांत साळुंके यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीसाठी जीसीबी भाड्याने देतो म्हणून मध्यप्रदेशातील एका भामट्याने जवळपास साडेचार लाखाची फसवणूक केली आहे.
आरोपी नामे-1)संदीप सोहनलाल साहु, रा. ग्राम सेमरा शहडोल मध्यप्रवेश यांनी दि. 05.03.2022 रोजीचे 12.00 ते दि. 10.03.2024 रोजी 24.00 वा. सु. सिटी पॅलेस लॉजवर जिल्हा न्यायालय धाराशिव येथे फिर्यादी नामे- प्रशांत बिभीषन साळुंके, वय 40 वर्षे, रा. बाळासाहेब ठाकरे नगर धाराशिव यांना जे.सी.बी. भाड्याने देण्याचे कबुल करुन फिर्यादीकडून 4,35,000₹ दिले. तसेच नमुद आरोपीने विश्वासाने पैसे घेवून जीसीबी भाड्याने ने देता फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रशांत साळुंके यांनी दि.13.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नुकसान प्रकरणी गुन्हा
परंडा : आरोपी नामे-1)सागर गंगाराम मुळे, 2) लक्ष्मीबाई उर्फ ताई गंगाराम मुळे रा. तांबेवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.19.03.2024 रोजी 17.00 ते दि. 03.04.2024 रोजी 18.00 वा. सु. तांबेवाडी ता. भुम गट नं 58 तांबेवाडी शिवार फिर्यादी नामे- रमेश देवराव खुने, वय 64 वर्षे, रा.जुना नाका संत साईबाबा सोसायटी धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे तांबेवाडी येथील शेत गट नं 58 वर्षे अमिक्रमण करुन दुसऱ्या वर्षाचा राखलेला उसाचा पोगारा पाचाटासह जाळुन नुकसान केले व दोन्ही तुकड्यामध्ये मध्यभागी बांधावरील आंब्याच्या झाडास आग लावून अंदाजे 6,00,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश खुने यांनी दि.13.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 447, 435, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.