• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान दीड वर्षापासून प्रलंबित

admin by admin
June 12, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

Kailsh Patil

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्हयासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचे मागील १५ महिन्यापासुन अनुदान प्रलंबित आहे. हे अनुदान पेरणीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी आ. कैलास पाटील यांनी कृषी आयुक्त पुणे व फलोत्पादन संचालक यांच्याकडे केली आहे.

‘पर ड्रॉप, मोअर क्रॉप’ अशी घोषणा देऊन सरकारने उत्पादन वाढीसाठी ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.अल्प, अत्यल्प व इतर शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन घेण्यासाठी अनुदानाची सोय निर्माण केली.हे अनुदान महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पध्दतीने शेतकऱ्यांची निवड होते.शेतकऱ्यांना साहित्य खरेदी करण्यासाठी पुर्वसंमती दिली जाते. संबंधित कंपनीच्या डीलरकडून घेतलेल्या साहित्याचे बील अपलोड केले जाते.कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात एक ते दोन महिन्यात जमा करण्यात येते. परंतु जिल्हयातील सात हजार ९६९ एवढया शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी करुन १५ महिन्याचा कालावधी होऊन गेला तरीही त्यांना अपेक्षित असलेली १६ कोटी ८३ लाख एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली नाही.

अनुसुचित जातीच्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर व सर्वसाधारण गटातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक एप्रिल २०२३ पासुन तुटपुंजी रक्कम वर्ग करण्यात आल्याचे दिसते. मागील वर्षीचा दुष्काळ त्यात आत पेरणीचे दिवस अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना खते, बियाण्यासाठी पैशाच्या आवश्यकता आहे. शासनाच्या भरवशावर पैसे गुंतवणूक करून बसलेल्या शेतकऱ्यांना आता महत्वाच्या काळात अनुदानाच्या रक्कमेची वाट पहावी लागत आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना सतत कृषी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. धाराशिव जिल्हयासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे महाडीबीटी पोअर्लवरील ठिबक व तुषार सिंचन योजनेने मागील १५ महिन्यापासुन प्रलंबित असलेले अनुदान पेरणीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी केली आहे.

गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ. पाटील

वेगवान निर्णय व गतिमान सरकार म्हणून जाहिरात करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांबाबत एवढा आकस का आहे..? आधीच दुष्काळ त्यात कर्जाने पैसे घेऊन शेती उपयोगी साधने घेणाऱ्या शेतकऱ्यांना दीड वर्ष होऊनही त्यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत हे दुर्दैवी आहे. पेरणीअगोदर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.

Previous Post

उमरगा आणि येरमाळा येथे चोरी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!