धाराशिव : फिर्यादी नामे-भैरु विश्वनाथ मिसाळ, वय 65 वर्षे, रा. जहागिरदारवाडी, ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.18.12.2023 रोजी 22.00 ते दि. 19.12.2023 रोजी 04.00 वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 80,000₹ असा एकुण 1,39,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भैरु मिसाळ यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे-आकाश महादेव लोभे, वय 22 वर्षे, रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची स्प्लेंडर प्लस काळ्या सिल्व्हर रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.पी 9059 ही दि.13.12.2023 रोजी रात्री 22.00 ते दि. 14.12.2023 रोजी 02.00 वा. सु. फिर्यादी आकाश लोभे यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश लोभे यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : फिर्यादी नामे-विजयानंद सुभाष रसाळ, वय 28 वर्षे, रा. लोहारा खुर्द, ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो डिलक्स कंपनीची लाल काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 12 एस.व्ही. 2590 लाल काळ्या रंगाची ही दि.07.12.2023 रोजी रात्री 20.30 ते 21.00 वा. सु. लोक मंगल साखर कारखाना लोहारा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजयानंद रसाळ यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-चेतन प्रकाश पवार, वय 25 वर्षे, रा. बाभळगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर पांढऱ्या काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25एएफ. 4465 ही दि.23.11.2023 रोजी रात्री 15.00 वा. सु. बाभळगाव शिवारात असलेल्या वैष्णवी दुध डेअरीच्या पाठीमागून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- चेतन पवार यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.