धाराशिव: शहरातील वैराग नाक्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अत्यंत बेजबाबदारपणे आणि धोकादायकरित्या टेम्पो उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी एका टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शुक्रवारी, ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. धाराशिव शहर पोलीस वैराग नाका रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना एक टेम्पो (क्रमांक एमएच १३ सीयु ०८४७) रस्त्यावर धोकादायकरित्या उभा केलेला आढळला. या टेम्पोमुळे इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
पोलिसांनी चौकशी केली असता, चालकाचे नाव बालाजी निवृत्ती पवार (वय ३३, रा. मुंगशी, ता. बार्शी, जि. सोलापूर) असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन, चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.