लोहारा येथील 1008 भगवान अदिनाथ दिगंबर जैन मंदिरात 3 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दार फोडून दानपेटीतील अंदाजे 22,000 रुपये रोख लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी संतोष बाबुराव छंचुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, कळंब तालुक्यातील आडसुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत 4 ऑगस्ट रोजी दुपारी सचिन रामभाउ आडसुळ याने खाद्य वाटप कक्षाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. शाळेतील साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी शैला भिष्माचार्य गंभीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.