धाराशिव : फिर्यादी नामे-जयश्री सिध्देश्वर घुटुकडे, वय 52 वर्षे, रा. शिवाजी नगर साईकमल हॉटेलच्या पाठीमागे ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 30.04.2024 रोजी 08.00 ते 17.30 वा. सु तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातील 85 ग्रॅम वाजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकुण 3,05,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जयश्री घुटुकडे यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-सुरेश भिमा पवार, वय 73 वर्षे, रा. भगतसिंग तांडा उंबरे कोठा धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची टिव्हीएस कंपनीची एक्सएल 100 हेव्ही ड्युटी लुना क्र एमएच 25 एएन 4518 ही दि. 28.04.2024 रोजी 16.30 वा. सु. देशमुख हॉस्पीटल नाईकवाडी नगर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश पवार यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-भाग्यश्री राजेंद्र पिंगळे, वय 54 वर्षे, रा. बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर या श्री येडेश्वरी यात्रेत दर्शनासाठी आल्या असता भाग्यश्री पिंगळे यांचे गळ्यातील अंदाजे 51,000₹ किंमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हे दि. 24.04.2024 रोजी 11.30 वा. सु. आमराई येरमाळा येथुन अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भाग्यश्री पिंगळे यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.