• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडीत ६७ हजारांचा ऐवज, तर दोन मोटारसायकली लंपास

admin by admin
June 14, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
96
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेंबळी, मुरुम आणि धाराशिव शहर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केशेगावात कुटुंब झोपेत असताना घरफोडी

बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केशगाव येथे एक धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. सोमनाथ भिमराव वाघाळे (वय ५०) हे २१ मे २०२५ रोजी रात्री आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते. पहाटे पावणेतीन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने घराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले १७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ६७,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सोमनाथ वाघाळे यांनी १३ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात सतिष कमलाकर गिरी (रा. विठ्ठलवाडी, ता. धाराशिव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा आणि धाराशिव शहरातून दोन मोटारसायकली चोरीला

जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुयार चिंचोली येथील शुभम शाहुराज लोंढे (वय २३) यांची २५ हजार रुपये किमतीची हिरो एचएफ मोटारसायकल (क्र. एमएच २५ एयु ४०५९) १० जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास रस्त्यावरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

दुसरी घटना धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भानुनगर येथील रहिवासी जितेंद्र पोपट नाईकवाडी (वय ४८) यांची ३० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच २५ झेड १२२०) २७ मे रोजी सायंकाळी पाच वाजता आरपी कॉलेजच्या गेटजवळून चोरीला गेली.

या दोन्ही वाहनचोरीच्या घटनांप्रकरणी पीडित मालकांनी १३ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून अनुक्रमे मुरुम आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस या सर्व प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

परंडा : ५५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ करत तोंडावर थुंकले; चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

नळदुर्ग पोलिसांची पान टपरीवर धाड, ९ हजारांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग पोलिसांची पान टपरीवर धाड, ९ हजारांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group