• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा : ५५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ करत तोंडावर थुंकले; चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 14, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
799
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी : परंडा तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ५५ वर्षीय महिलेवर गावातीलच चार तरुणांनी घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. इतकेच नाही, तर तिच्या तोंडात मिरची पावडर भरून तोंडावर थुंकण्याचे अमानुष कृत्यही केले.

ही घटना शुक्रवारी, १३ जून २०२५ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिला घरात एकटीच असताना आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यांनी सुरुवातीला जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पीडितेला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर या नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या भयंकर प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत त्याच दिवशी आंबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गावातीलच चार तरुणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

आंबी पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ६४(१), ७४, ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) यांसारख्या गंभीर कलमांखाली, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी अॅक्ट) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये स्कुटीच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडीत ६७ हजारांचा ऐवज, तर दोन मोटारसायकली लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडीत ६७ हजारांचा ऐवज, तर दोन मोटारसायकली लंपास

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!