धाराशिव : ऑनलाईन पध्दतीने पार्ट टाईम जॉबची ऑफर देवून जिल्हा कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल संतोष केरबा सरनाईक यांना एका भामट्याने साडेसात लाख रुपयांस गंडा घातला आहे. याप्रकरणी सरनाईक यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे.
फिर्यादी नामे- संतोष केरबा सरनाईक, वय 35 वर्षे, व्यवसाय (कनिष्ठ लेखापाल जिल्हा कोषागार कार्यालय, धाराशिव ) रा. गिरगाव ता.करवीर जि. कोल्हापुर ह.मु. सी क्वॉर्टर कोहीनुर हॉटेल च्या पाठीमागे आनंदनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना अनोळखी व्यक्तींनी 1)मोबाईल नं 9007225171 चा धारक, 2) एस.बी.आय. बॅक खाते, क्रमांक42903276245 चा धारक, 3) इनडुसलॅन्ड बॅक खाते क्र 201029681700,4)यश बॅक खाते क्र 070163400001637 (ifsc code YESB0000701 चा धारक, 5) एस.बी.आय. बॅक खाते क्र 42905091863 चा धारक, 6) एस. बी.आय. खाते क्र 42898558970 चा धारक, 7)एस. बी.आय. खाते क्र42926860995 चा धारक यांनी दि. 07.05.2024 रोजी 10.37 ते दि. 14.05.2024 रोजी 18.35 वा. सु. कार्यालय व घरी ऑनलाईन पध्दतीने पार्ट टाईम जॉब ची ऑफर देवून टेलीग्राम ॲपवर लिंक पाठवून त्यामध्ये माहिती भरण्यास सांगुन वेगवेगळ्या प्रकारचे टेलीग्राम ॲप वरील टास्क देवून पैसे भरण्यास सांगितले.
फिर्यादीने नमुद आरोपीचे बॅक खात्यावर एकुण 7,49,679 ₹ फोन पे व आर.टी.जी.एस द्वारे पाठवले व टास्क पुर्ण करुन जास्त पैसे मिळवण्याचे आमीष दाखवून नमुद रक्कम भरण्यास सांगुन फिर्यादीने सदरची रक्कम परत मिळणे बाबत मोबाईल फोन व मेसेज द्वारे विचारणा केली असता नमुद आरोपींनी तुला काय करायचे ते करुन घे असे म्हणून फिर्यादीने भरलेले पैसे परत न देता फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संतोष सरनाईक यांनी दि.17.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो. ठाणे येथे 420, भा.दं.वि.सं. सह 66 सी, 66 डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.