तुळजापूर :आरोपी नामे- 1) जेयश मोहन जाधव,2) संग्राम मोहन जाधव, 3) तात्या गैबु बोराडे, 4) गैबु बोराडे, 5) वंदाबाई मोहन जाधव, 6) मोहन जाधव सर्व रा. मातंगनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.06.12.2023 रोजी 21.30 वा. सु. मीवजे हळदीकुकांचे कारखान्याचे समोर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-कुमार शंकर पौळ, वय 21 वर्षे, रा. मातंगनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून 3000₹चे आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कुमार शंकर पौळ यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 427, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे- 1)सुरेश काशिनाथ राठोड,2) जनाबाई सुरेश राठोड, 3) जयश्री सुरेश राठोड, तिघे रा. अंबेजवळगे ता. जि. धाराशिव यांनी दि. 12.12.2023 रोजी 20.00 वा. सु. पप्पु पडवळ यांचे शेताजवळ अंबेजवळगा येथे फिर्यादी नामे- माणिक लक्ष्मण चव्हाण, वय 53 वर्षे, रा. एमएस ई बी सबस्टेशन जवळ अंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमच्या घरावर बॅटरीचा उजेड का मारलास या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- माणिक चव्हाण यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे- 1)असिफ पठाण,2)सुरज कांबळे, 3) रोहीत चुंगे,4) ओम चौधरी, सर्व उमरगा ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 12.12.2023 रोजी 22.00 वा. सु. जे.के.बार जवळ उमरगा येथे फिर्यादी नामे- लहु दिलीप जमादार, वय 21 वर्षे, रा. नळवाडी ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पानटपरीची उधारी न दिल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दांडापट्टा, हंटर व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- लहु जमादार यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.