उमरगा : फिर्यादी नामे-वनिता बाळु भगत, वय 32 वर्षे, रा. जगदाळवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव यांचेराहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 12.12.2023 रोजी 21.00 वा. सु. दि. 13.12.2023 रोजी 08.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील संदुकामधील रोख रक्कम 65,000₹, 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल क्र एमएच 25 एई 4404 किंमत अंदाजे 30,000₹असा एकुण 2,75,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वनिता भगत यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-सच्चिदानंद कल्याणराव आवटे, वय 36 वर्षे, रा. वडगाव ता. गेवराई जि. बीड हे ट्रॅव्हलसने प्रवास करत असताना दि. 13.12.2023 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. तेरखेडा येथील आरुष बिअरबार ते तेरखेडा दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हलच्या टपावर चढून बॅगमध्ये ठेवलेली रोख रक्कम 59,000₹व 15 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण 89,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सच्चिदानंद आवठे यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-गफार मैनोद्दीन मुलानी, वय 47 वर्षे, रा. सुरवसे पार्क विजापूर रोड सोलापूर हे व त्यांच्या पत्नी बसस्थानक धाराशिव येथे असताना अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे पत्नीचे पर्स मधील अंदाजे 60,000₹ किंमतीचे 34 ग्रूम वजनाचे सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गफार मुलानी यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-गुरुलिंग केरबा तेली, वय 52 वर्षे, रा. ओमनगर विठ्ठल रुक्मीणी मंदीरा समोर धाराशिव यांचे स्विफ्ट डिजायर क्र एमएच 14 डीएन 1624 चे चारही चाके(टायर) अंदाजे 12,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने दि. 13.12.2023 रोजी 23.00 ते दि. 14.12.2023 रोजी 01.30 वा. सु. फिर्यादी गुरुलिंग तेली यांचे राहाते घरासमोरुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गुरुलिंग तेली यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.