• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचे सात किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण

दहा पोकलेन मशीन, 80 हायवा टिप्पर आणि 300 कामगार रात्रंदिवस कार्यरत

admin by admin
November 5, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचे सात किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव-तुळजापूर या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 10 पोकलेन मशीन, 80 हायवा टिप्पर आणि 300 कामगारांच्या सहाय्याने रात्रंदिवस काम सुरू आहे. एकूण तीस किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गापैकी सात किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण झाले आहे. कामच वेग असाच कायम राहिल्यास,आपण ठरविलेल्या उद्दिष्टानुसार पुढील 24 महिन्यांच्या आत कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत रेल्वेमार्गाचे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले तुळजापुर रेल्वेचे स्वप्न आता प्रत्यक्ष साकार होत आहे. एकूण 84 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. धाराशिव ते तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील 30 किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या कामास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ झाला. वाहन व यंत्रांचे नारळ फोडून आपण पूजन केले होते. सध्या उपळा ते सांजा दरम्यान सहा किलोमीटर अंतराचे तर पळसवाडी परिसरात एक किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण झाले आहे. पुढील कामही मोठ्या वेगात सुरू आहे.

या नवीन रेल्वेमार्गाचे काम खरतर 2019 सालीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी ठाकरे सरकारने राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिला नव्हता. त्यामुळेच अडीच वर्षे हे काम रखडले होते. राज्यात आपले महायुती सरकार आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी 452.46 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला गती आली आहे. सुरूवातीला पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आता तीन टप्प्यांत कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. पुढील दोन वर्षांच्या आत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ज्या गतीने आत्ता काम सुरू आहे, ते पाहता ठरविलेल्या उद्दिष्टानुसार नक्की काम पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यातील कामासाठी धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील 15 गावांमधील 494.26 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात बोगद्याच्या कामांना हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकूण अंतर 84 किलोमीटर; 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण 84 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 32 गावांतील एक हजार 375 एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्यात आली आहे. संपादीत जमिनीच्या वाढीव मावेजासाठी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

धाराशिव-तुळजापूर ब्रॉडगेजसाठी 544 कोटींचा खर्च

पहिल्या टप्प्यातील 30 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी 544 कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. जास्तीत जास्त 24 महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. या रेल्वेमार्गामुळे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर येणार आहे.

तीन नवीन रेल्वेस्थानक

धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या 10 किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या 12 किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 21 कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Previous Post

तुळजापूरमध्ये बनावट मुद्रांक प्रकरण: चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बेंबळीत महिलेवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

बेंबळीत महिलेवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व अपमान; १९ वर्षीय तरुणीची विष पिऊन आत्महत्या

November 10, 2026
धाराशिव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ८० लाखांच्या गांजासह आयशर जप्त, दोघांना बेड्या

धाराशिव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ८० लाखांच्या गांजासह आयशर जप्त, दोघांना बेड्या

November 10, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

येरमाळा : पिकअपमधून गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक

November 9, 2026
रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

तुळजापूर : चिवरी येथे पत्र्याच्या शेडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पश्चिम बंगालमधील दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

November 9, 2026
येडशी अग्नितांडव : अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणाने चार जीव गेले? गावकऱ्यांचा गंभीर आरोप; प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करा!

येडशी अग्नितांडव : अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणाने चार जीव गेले? गावकऱ्यांचा गंभीर आरोप; प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करा!

November 9, 2026

Recent Posts

  • कळंब : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व अपमान; १९ वर्षीय तरुणीची विष पिऊन आत्महत्या
  • धाराशिव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ८० लाखांच्या गांजासह आयशर जप्त, दोघांना बेड्या
  • येरमाळा : पिकअपमधून गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक
  • तुळजापूर : चिवरी येथे पत्र्याच्या शेडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पश्चिम बंगालमधील दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • येडशी अग्नितांडव : अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणाने चार जीव गेले? गावकऱ्यांचा गंभीर आरोप; प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करा!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!