• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, January 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवचा ‘व्हायरल’ आखाडा: पाणी योजनेपासून ते पप्पीपर्यंत!

admin by admin
September 7, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक :  “ढोल-ताशे थांबले… आता राजकीय फड रंगणार!”
0
SHARES
477
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मंडळी, धाराशिवच्या राजकीय आखाड्यात लवकरच शड्डू ठोकले जाणार आहेत. सध्या वातावरण शांत दिसत असलं तरी आतून सगळी ‘मोर्चेबांधणी’ नावाची खिचडी शिजतेय. ही खिचडी साधीसुधी नाही, तर ‘ट्रिपल तडका’ मारलेली आहे.

एकेकाळी एकसंध असलेली शिवसेना आता ‘ठाकरे स्पेशल’ आणि ‘शिंदे स्पेशल’ अशा दोन वेगवेगळ्या डिशेस झाल्या आहेत. राष्ट्रवादीची अवस्था तर त्याहून भारी, तिथे ‘मोठे साहेब’ आणि ‘धाकटे साहेब’ यांच्या नावाचे दोन वेगवेगळे स्टॉल लागले आहेत. राहिला भाजप, तिथे तर ‘ओरिजनल’ आणि ‘इम्पोर्टेड’ माल अशी गटवारी आहे. थोडक्यात काय, तर मतदार नावाच्या गिऱ्हाईकाला प्रश्न पडलाय की नक्की कोणत्या स्टॉलवर जायचं?पण या निवडणुकीची खरी मजा तर एका जुन्या ‘व्हिडीओ बॉम्ब’मध्ये लपलेली आहे.

किस्सा कुछ यूँ है…

गेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे दोन तगडे उमेदवार होते, समजा एकाचं नाव गोट्याभाऊ आणि दुसऱ्याचं बबनराव. दोघेही एकमेकांचे वरून मित्र आणि आतून कट्टर वैरी. निवडणुकीचा प्रचार करून पार डोक्याचा भुगा झाला होता. शीण घालवण्यासाठी दोघेही, सोबत एका चमच्याला घेऊन, शहराबाहेरच्या ‘कला केंद्रात’ (म्हणजे आपला साधा तमाशाचा फड हो!) पोहोचले.

आतमध्ये माहोल एकदम ‘टाईट’ होता. घुंगरांचा आवाज आणि ढोलकीच्या तालावर गोट्याभाऊ आणि बबनराव पार रंगून गेले. नशेत दोघांनाही आपण भावी नगराध्यक्ष आहोत याचा विसर पडला. नाचणाऱ्या कलावतीवर पैशाचा पाऊस पडत होता. इतक्यात, एका कलावतीने गोट्याभाऊंच्या जवळ येऊन थेट गालावर एक ‘पप्पी’ घेतली.

बस! गोट्याभाऊंचा अहंकार सुखावला. ते नशेतच त्या कलावतीला म्हणाले, “ओ बाईसाहेब, हा पैसा साधासुधा समजू नका. शहराच्या पाणी पुरवठा योजनेत जे ‘पाणी मुरवलं’ आहे ना, हा तोच पैसा आहे. तुमच्या कलेसाठी आम्ही भ्रष्टाचाराची गंगा जरी वाहवली तरी कमीच!”

इकडे गोट्याभाऊ हे ‘सत्यवचन’ बोलत असताना, त्यांच्यासोबत आलेला तो हुशार चमचा आपला मोबाईल काढून सगळं काही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत होता. त्याला माहित होतं की ही क्लिप साधीसुधी नाही, तर राजकीय ‘ब्रह्मास्त्र’ आहे.

दुसऱ्याच दिवशी बबनरावांनी त्या चमच्याला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ‘पत्री’ दिली. चमचा खुश झाला आणि त्याने ते ‘ब्रह्मास्त्र’ बबनरावांच्या हाती सोपवलं.

तेव्हापासून धाराशिवमध्ये एक वेगळंच राजकारण सुरू झालं. गोट्याभाऊंनी बबनरावांच्या विरोधात एखादं पाऊल उचललं की बबनरावांचा एकच फोन यायचा, “भाऊ, ‘कला केंद्रातली’ कला परत एकदा लोकांसमोर आणू का?”

…आणि गोट्याभाऊ गार पडायचे.

आता पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. सगळेच गट-तट एकमेकांना भिडायला तयार आहेत. गोट्याभाऊ आणि बबनराव पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण धाराशिवची जनता निवडणुकीच्या जाहीरनाम्यापेक्षा त्या व्हिडिओची जास्त वाट पाहत आहे.

लोक एकमेकांना विचारत आहेत, “काय रे, यंदा तरी बबनराव तो व्हिडिओ व्हायरल करणार का?”

आता खरा प्रश्न हा नाही की व्हिडीओ बाहेर येणार का… खरा प्रश्न हा आहे की, ‘पहिला डाव कोण टाकणार?’ आणि धाराशिवची जनता आपल्या मोबाईलची चार्जिंग फुल ठेवून आणि डोळ्यात तेल घालून त्या ‘व्हायरल’ क्षणाची वाट पाहत आहे!

Previous Post

धाराशिव पीक विमा प्रकरण: २०२० ची सुनावणी १० सप्टेंबरला, २०२१ चा निकाल कधीही…

Next Post

परंडा – घारगाव तांड्यात तरुणाला बेदम मारहाण; भांडण सोडवणे आले अंगाशी, सहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

परंडा - घारगाव तांड्यात तरुणाला बेदम मारहाण; भांडण सोडवणे आले अंगाशी, सहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजप सज्ज; तिकिटासाठी इच्छुकांची मांदियाळी, तब्बल ७१२ अर्ज दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा शहरात निवडणुकीच्या वादातून राडा; तरुणासह पुतण्यावर लोखंडी रॉडने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वडगाव (ज) येथे भररस्त्यात तलवारीसह फिरणाऱ्या तरुणावर कारवाई

January 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; चार ठिकाणी घरफोडी व चोऱ्या, ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

January 16, 2026
धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

January 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group