धाराशिव: गेल्या काही दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यात घरे, गोदामांमधून वाहन आणि मंदिरातूनही चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
- वाशी: बबन विश्वनाथ रणदिवे यांच्या घरात अज्ञात चोरांनी रात्रीच्या वेळी शिरून ६० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १७,००० रुपये रोख चोरून नेले.
- उपळा: परीक्षित विक्रम पडवळ यांच्या गोदामाचे कुलूप तोडून चोरांनी ४० कट्टे सोयाबीन चोरून नेले.
- कलदेव निंबाळा: कल्लेश्वर मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात व्यक्तीने १५,००० ते १६,००० रुपये चोरून नेले.
- तुळजापूर: विकीन आनंद बंडगर यांच्या घरासमोरून चार शेळ्या, एक बोकड आणि दोन पिल्ले चोरी झाली.
- येरमाळा: सुरजित सिंह हरबंस सिंह यांच्या गाडीतून टायर आणि सायकल ट्युब चोरी झाली.
वाशी : फिर्यादी नामे-बबन विश्वनाथ रणदिवे, वय 46 वर्षे, रा. डेगरेवाडी, ता. वाशी ह.मु. वाशी जि. धाराशिव त्यांचे राहते घरात कुंटूबासह झेापलेले असताना अज्ञात व्यक्तीने दि.12.07.2024 रोजी 22.00 ते दि. 13.07.2024 रोजी 03.15 वा. सु लोखंडी गेट उघडून आत प्रवेश करुन घरातील 60ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 17,000₹ असा एकुण 1, 38,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बबन रणदिवे यांनी दि.14.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 331(4),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-परिक्षीत विक्रम पडवळ, वय 25 वर्षे, रा. उपळा मा., ता. जि. धाराशिव यांचे शाहुनगर ते उपळा गावात जाणारे रोडलगत असलेल्या गोडावुनचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 12.07.2024 रोजी 20.30 ते दि. 13.07.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडॅन आत प्रवेश करुन सोयाबीनचे 40 कट्टे अंदाजे 1,08,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- परिक्षीत पडवळ यांनी दि.14.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : दि.12.07.2024 रोजी 21.00 वा. सु. ते दि. 13.07.2024 रोजी 04.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने कलदेव निंबाळा येथील कल्लेश्वर मंदीराची लोखंडी जाळी लगत असलेली दान पेटी फोडून अंदाजे 15,000 ते 16,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहन पांडुरंग पाटील, वय 60 वर्षे, रा कलदेव निंबाळा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.14.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 324(2-6) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-विकीन आनंद बंडगर, वय 28 वर्षे, रा. भातंब्री, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे चार शेळ्या, एक बोकड, दोन पिल्ले, असा एकुण 46,000₹ किंमतीचे हे दि. 13.07.2024 रोजी 02.00 वा. सु.विकीन बंडगर यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विकीन बंडगर यांनी दि.14.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-सुरजित सिंह हरबंस सिंह, वय 43 वर्षे, रा. दुणेके ता. जि. मोगा राज्य पंजाब यांनी दि. 26.06.2024 रोजी 03.00 वा. सु. तेरखेडा शिवारातील तेरखेडा ब्रिजच्या पुढे एनएच 52 रोडवर गाडी विंश्रातीसाठी थांबले असता अज्ञात व्यक्तीने सुरजित सिंह यांचे गाडीतील 8 बंडल पोद्दार ॲटो टायर व 219 सायकल टायर ट्युब पैकी 4 बंडल ॲटो टायर, 1 बंडल सायकल टायर ट्युब असे एकुण 35, 265 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरजित सिंह यांनी दि.14.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.