वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटा पॉवर कंपनीच्या गोडावून येथील प्रकल्पस्थळी कामगारांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास राजु उर्फ राजाभाउ माने याच्यासह 8 जणांनी महावीर पवार (वय 19) या कामगाराला काम करण्यास मज्जाव केला. पवार यांनी काम सुरूच ठेवल्याने आरोपींनी त्यांच्यावर कत्तीने वार करून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सुपरवायझर धनंजय गायकवाड यांनाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय, आरोपींनी दगडफेक करून कंपनीच्या हायवा व जिसीबीच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोपी नामे- राजु उर्फ राजाभाउ लक्ष्मण माने रा. भुम, संतोष त्रिंबक जाधवर, रा. इसरुप, नाना बबन जोगदंड, रा. पिंपळगाव क., काकासाहेब शिवाजी धावारे, रा. मांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर, परमेश्वर मच्छीद्र पवार, रा. सोनारी, सुमित दिलीप तेलंग, भुम, तानाजी साहेबराव धावारे, रा. बार्शी यांनी दि.21.08.2024 रोजी 17.30 वा. सु. एनएच 52 रोडलगत सांळुके पेट्रोल पंपाजवळ टाटा पॉवर कंपनीचे गोडावून येथे फिर्यादी नामे-महावीर अर्जुन पवार, (वय 19 वर्षे, रा. वडार गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव )यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुला कामाला येवू नको असे सागिंतले असताना तु काम चालु केलेस असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून कत्तीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच सुपरवायझर धनंजय गायकवाड हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.
या प्रकरणी पीडित कामगार महावीर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाशी पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध भादंवि कलम 109 (गैरकायदेशीर कृत्य करण्यासाठी किंवा गुन्हा करण्यासाठी लोकांना एकत्र करणे), 115(2) (जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीला गंभीर गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), 324 (धोकादायक शस्त्राने किंवा इतर मार्गांनी स्वेच्छेने दुखापत करणे), 351(2) (प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), 189(2) (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यात अडथळा आणण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), 191(2) (खोटी साक्ष देण्यास प्रवृत्त करणे किंवा खोटी साक्ष देण्यास मदत करणे), 190 (लोकसेवकाला त्याच्या कायदेशीर कर्तव्याच्या निर्वहनात अडथळा आणणे) सह 4/25 भा.ह.का. (भारतीय हत्यार कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.