• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव झेडपीचा मनमानी कारभार! ‘एकाच’ ठिकाणाहून गणवेश खरेदीच्या अट्टाहासापायी गोरगरीब विद्यार्थी वेठीस

'तोंडी' आदेशामागील 'अर्थ'पूर्ण गौडबंगाल काय?

admin by admin
July 3, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: राज्य शासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याचा गाजावाजा केला खरा, पण धाराशिवमध्ये या शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले तरी जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांतील गोरगरीब विद्यार्थी अद्याप हक्काच्या गणवेशापासून वंचित आहेत. या सगळ्या सावळागोंधळाला धाराशिव जिल्हा परिषदेचा बेकायदेशीर ‘तोंडी’ हस्तक्षेप आणि एकाच ठिकाणाहून गणवेश खरेदी करण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरत असून, यामागे नेमके कोणते गौडबंगाल दडले आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अधिकार शाळा समितीचे, पण हुकूमशाही झेडपीची!

नियम आणि आजवरच्या प्रथेनुसार, गणवेश कसा आणि कुठून घ्यायचा याचा निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार ‘शाळा व्यवस्थापन समिती’ आणि ‘मुख्याध्यापकांना’ असतात. मात्र, या अधिकारांवर थेट गदा आणण्याचे काम धाराशिव जिल्हा परिषदेने केले आहे. झेडपीच्या नव्या कारभारीण यांनी सर्व शाळांना ‘एकाच ठिकाणाहून आणि एकसारखाच’ गणवेश घेण्याच्या तोंडी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वरिष्ठांच्या या अलिखित आणि मनमानी तंबीमुळे मुख्याध्यापक दहशतीखाली असून, कारवाईच्या भीतीने त्यांनी अद्याप गणवेश खरेदी किंवा वाटपच केलेले नाही.

एकाच ठेकेदाराचा अट्टाहास कोणाचे खिसे गरम करण्यासाठी?

  • जर शासनाने गणवेशाचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत, तर एकाच ठिकाणाहून गणवेश खरेदी करण्याचा हा घाट नेमका कोणाच्या भल्यासाठी घातला जात आहे?

  • या ‘तोंडी आदेशां’मागे कोणती टक्केवारी दडली आहे?

    असे बोचरे प्रश्न शिक्षण क्षेत्रातून आणि ग्रामीण भागातील पालकांमधून विचारले जात आहेत. झेडपीच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे मौन संशयास्पद!

जिल्हा परिषदेच्या या हुकूमशाही आणि संशयास्पद कारभारावर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? ते या प्रकरणात लक्ष घालून गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार की झेडपी अध्यक्षांच्या या मनमानीला त्यांचाही ‘छुपा पाठिंबा’ आहे? असा संतप्त सूर आता शिक्षणप्रेमी आणि नागरिकांमधून उमटू लागला आहे.

प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हक्काचे गणवेश तत्काळ न दिल्यास तीव्र असंतोष भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Previous Post

धाराशिवच्या होमगार्ड कार्यालयात धिंगाणा घालणारा कथित तोतया पोलीस राम बोंदर अखेर जेरबंद; मोबाईल सीडीआर तपासणीकडे लक्ष

Next Post

थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून धाराशिवमधील तरुणाचे अपहरण; सायबर गुन्हेगारांनी डांबून ठेवत करून घेतला ऑनलाईन फ्रॉड

Next Post
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून धाराशिवमधील तरुणाचे अपहरण; सायबर गुन्हेगारांनी डांबून ठेवत करून घेतला ऑनलाईन फ्रॉड

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026

Recent Posts

  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!