ढोकी :आरोपी नामे-1)इरशाद अरिफ हत्तीवाले, 2) अरिफ शरीफ हत्तीवाले, 3) शहनाज अरिफ हत्तीवाले, 4) मैनाज मिनाज शेख सर्व रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.05.04.2024 रोजी 19.00 ते 19.30 वा. सु. ढोकी येथे फिर्यादी नामे- आयुब अनिस काझी, वय 42 वर्षे, रा. पेट्रोलपंप ढोकी ता. जि. धाराशिव यांच्या मुलीस नमुद आरोपी काही बोलला असता फिर्यादी त्यास विचारण्यास गेल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन कोयता, रॉड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे पत्नी व मुलगा हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही माहराण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे आयुब काझी यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 326, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुरात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
तुळजापूर : मयत नामे- संदीप संतोष शिंदे, वय 14 वर्षे, केवडनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.31.03.2024 रोजी 15.30 वा. सु.घरातील बाथरुम मध्ये पणी गरम करणेच्या हिटरला चिटकला असताना आरोपी नामे- अनिल राठोड, 2) सुरेखा राठोड दोघे रा. केवडनगर धाराशिव बायपास रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी लाईट बंद करणे व आकडा काढणे हे त्यांचे काम असताना नमुद आरेपीतांनी ष्डयंत्र रचुन अवैद्य कनेक्शन काढले नाही व हिटरचे बटन बंद केले नही त्यामुळे संदीप शिंदे यांच्या मरणास कारणीभुत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे संतोष गुरुलिंग शिंदे, वय 43 वर्षे, रा. केवडनगर तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 304, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.