धाराशिव – शासकीय शेतजमीन असताना बोगस ७/ १२ काढून पीक विमा भरून पीक विम्याची रक्कम उचलणाऱ्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील २४ बोगस शेतकऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
आरोपी नामे-1)संग्राम प्रभु मुरकुटे, ता. जि. बीड, 2) चाटे राहुल शिवाजी, रा. खापरटोने ता. आंबाजोगाई जि. बीड, 3) रवि नारायण पुरी घाटनांदुर ता. अंबेजोगाई, 4) लक्ष्मण विनायक आघाव, रा. आंबेगाव ता. माजलगाव जि. बीड, 5) महादेव गणपती वरकले रा. पहाडी पारगाव ता. धारुर जि. बीड, कृष्ण बालाजी आंधळे रा हेळंब ता. परळी जि. बीड, 7) महेश सोमनाथ बुरांडे धर्मापुरी ता. परळी, 8)गजानन व्यंकट होळंबे रा. होळंबे ता. परळी, 9) अजय दत्तात्रय गुटे रा. हेळंब ता. परळी जि. बीड, 10) विश्वनाथ व्यंकट आघाव र. हेळंब ता. परळी 11) अमर सुभाषराव देशमुखे ता. परळी, 12) धनराज महादेव होळंबे रा हेळंब ता. परळी, 13) रविंद्र दामोदर मुंढरे, लिंबुटा ता. परळी जि. बीड14) नंदनी रावसाहेब होळंबे ता. परळी, 15) विष्णु महादेव नागरगोजे, रा. नागदरा ता.जि. बीड, 16)विजय गिरधरी फड, रा.धर्मापुरी ता. परळी जि. बीड, 17) कृष्ण राम आंधळे रा. धनवत ता. सोयगाव जि. औरंगाबाद,18)कुणाल जयदेव मुळे, रा. वडगाव कोल्हाटी ता. सोयगाव जि. औरंगाबाद, 19)संदेश वैजीनाथ मुंढे, रा. अंतरवली ता. गंगाखेड जि. परभणी, 21) रघुनाथ प्रभु घोडके, रा. धानोरा मुक्ता ता. लोहा जि. नांदेड, 22) नावजी सौदागर अनभले रा. उपळाई खु ता. माढा जि. सोलापूर, 23) भोगील पांडुरंग जयराम रा. दांडेगाव ता. भुम, 24) अज्ञात ऑनलाईन सेवा केंद्र व ऑनलाईन सेवाकेद्रांचे चालक दि. 05.07.2023 रोजी ते दि. 03.08.2023 रोजी 22.40 वा. सु. बीड जिल्ह्यातील ऑनलाईन सेवा केंद्र बीड यांनी धाराशिव जिल्ह्यातील 2994.54 हेक्टर जमीन ही शासनाच्या मालकीची आहे ती शेतकऱ्यांच्या मालकीची अथवा शाकीय जमीनीवर भाडेकरार/संमतीपत्र केलेले नाहे हे माहित असताना सुध्दा ती 1170 शेतकऱ्यांच्या नावे बनावट सातबारे व 8 अ उतारे तयार करुन ते खरे आहे असे दाखवून शासनाची फसवणुक करुन प्रत्येक पिक विमा हप्ता प्रिमियम रु असे 1170 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले त्यामुळे शासनाचे 3,13,71,635,50₹ एवढी रक्कम विमा कंपनीला विमा हप्ता प्रिमीयम स्वरुपात अदा केल्यामुळे शासनाची गैरहानी झालेली आहे तसेच त्यावर पिक संरक्षीत होणारी एकुण 15,68,15,156₹ एवढा शासकीय निधीचा अपहार करण्याचे उद्देशाने बनावट दस्तऐवज बनवून बनावट नोंदी घेवून सदरची रक्कम अपहार करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बाबासाहेब विश्वनाथ वीर, वय 56 वर्षे, व्यवसाय कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव रा. गायत्री निवास लातुर यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 511, 417, 418, 465, 467, 468, 471 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- रणजीत तुकाराम समुद्रे, वय 46 वर्षे रा ज्ञानेश्वर मंदीराजवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांच्या बिल्डींग मध्ये 2018 पासून आरोपी नामे-1)कॅनरा बॅक शाखा धाराशिव येथील शाखेचे बॅक मॅनेजर धाराशिव यांनी शाखा चालू करण्याचा पाच वर्षाचा करार करुन स्टॅप ड्युटी भरुन शाखा चालू केली व तो करार व स्टॅप संपुष्टात आलेली असुन त्यांना नविन करार करण्या बाबत व नविन स्टॅप ड्युटी भरण्या बाबत सांगुन सुध्दा बॅक मॅनेजर आज पर्यंत नविन करार केला नाही. फिर्यादीने विश्वासाने दिलेल्या जागेचा नविन करार न करता बॅक मॅनेजर यांनी फिर्यादीचा विश्वासघात करुन फसणुक केली आहे. व जागेवर अतिक्रमण करुन राहत आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रणजीत समुद्रे यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 406, 447 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.