• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतातील आगीत अर्धा एकर ऊस अन् नारळाच्या झाडांसह दीड लाखांचे नुकसान; आवारपिंपरी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

admin by admin
April 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : शेतातील वाळलेले गवत आणि लाकडे पेटवून दिल्याने ही आग शेजारील शेतात पसरून अर्धा एकर ऊस, नारळाची झाडे आणि केबल जळून तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे घडली. तसेच, याप्रकरणी जाब विचारणाऱ्या वृद्ध शेतकरी महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालन एकनाथ गुंडे (वय ६२, रा. आवारपिंपरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे नुकसान झालेल्या व धमकी मिळालेल्या फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून धनाजी लक्ष्मण घळके (रा. आवारपिंपरी) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १२ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी धनाजी घळके याने स्वतःच्या शेतातील लाकडे आणि वाळलेले गवत जाळण्यासाठी पेटवून दिले होते. मात्र, ही आग भडकून शेजारीच असलेल्या शालन गुंडे यांच्या शेत गट नंबर १३० मध्ये पसरली. या आगीत गुंडे यांच्या शेतातील अर्धा एकर उसाचे पीक जळून खाक झाले. यासोबतच सात नारळाची झाडे आणि दोनशे फूट केबल वायरही जळून नष्ट झाली. या आगीत फिर्यादीचे एकूण १ लाख ५० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या अतोनात नुकसानीबाबत शालन गुंडे यांनी आरोपीला जाब विचारला असता, त्याने अरेरावी करत शिवीगाळ केली आणि ‘जीवे मारीन’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर शालन गुंडे यांनी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून परंडा पोलिसांनी आरोपी धनाजी घळके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६(एफ) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

टाकळीत यमाई देवी मंदिरात धाडसी चोरी; दीड किलोचा चांदीचा मुकुट अन् दागिन्यांसह १ लाख २१ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!