• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दारूच्या उधारीवरून ढोकीत तरुणावर कोयता, हंटरने जीवघेणा हल्ला; बार्शीतील दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : बारमधील दारूच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून एका २७ वर्षीय तरुणावर लोखंडी कोयता आणि हंटरने अमानुष हल्ला केल्याची खळबळजनक घटना ढोकी (ता. जि. धाराशिव) येथील जयभवानी नगर परिसरात घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी बार्शी (जि. सोलापूर) येथील दोघांवर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय आण्णासाहेब कवडे (वय २७, रा. जयभवानी नगर, ढोकी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हंसराज साठे आणि निखील साठे (दोघे रा. बार्शी, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अजय कवडे हे जयभवानी नगर येथील आंबाबाई मंदिराजवळ थांबले होते. यावेळी आरोपी हंसराज साठे आणि निखील साठे हे दोघे तेथे आले. त्यांनी अजयला गाठून, ‘तू बारमधील दारूची उधारी मागून आमची लोकांत इज्जत का काढतोस?’ असा जाब विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही आरोपींनी अजयला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या लोखंडी कोयत्याने आणि हंटरने अजयवर सपासप वार केले, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी हंटरचे घाव घालून अजय यांचा मोबाईल फोनही फोडून टाकला आणि मोठे नुकसान केले.

या घटनेनंतर शनिवारी (दि. १८ एप्रिल) अजय कवडे यांनी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची फिर्याद दिली. या खबरीवरून पोलिसांनी हंसराज साठे आणि निखील साठे या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८१(२), ३२४(४), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

शिराढोणच्या सरपंचांना विभागीय आयुक्तांचा दणका; विकास निधी अखर्चित व अपहार प्रकरणी पदावरून अपात्र!

Next Post

धाराशिव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले; रोख रकमेसह ६० हजारांचे दागिने चोरीला

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले; रोख रकमेसह ६० हजारांचे दागिने चोरीला

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!