ढोकी – एका गावातील 21 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 3 मार्च 2025 पर्यंत ती घरी एकटी असताना गावातीलच एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती केली. या घटनेनंतर तिने अखेर पोलिसांत धाव घेतली.
पीडितेच्या तक्रारीवरून भा.न्या.सं.कलम-69अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्यायालयात दोषारोपपत्र सादर
शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 11 मार्च 2025 रोजी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून रात्री 12.16 वाजता गुन्हा क्र. 53/2025 नोंदवण्यात आला. भा.न्या.सं. कलम 74, 78(1), 79, 333 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली. तसेच, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करत जलदगतीने तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.