ढोकी – ढोकी गावात बुधवारी (दि. १२) संध्याकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश कसबे (वय २३) यांना त्यांचा चुलत भाऊ शुभम कसबे यांच्यासह नितीन खंडागळे, राजू रसाळ, अजय रसाळ, सुदर्शन खंडागळे, विवेक रसाळ, क्रांतीवीर खंडागळे, शंभू रसाळ आणि साहिल रसाळ यांनी मोटारसायकलने कट मारण्याच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, कातडी बेल्ट आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण करून कसबे यांना जखमी केले.
दुसऱ्या घटनेत, जनाबाई रसाळ (वय ४३) यांना पालखीच्या पाया पडण्यासाठी गेल्या असता निलेश कसबे, पोपट कसबे, राजेंद्र कसबे, लक्ष्मण कसबे, शुभम कसबे, तेजस कसबे, योगेश कसबे आणि संदीप कसबे यांनी ढकलून दिले. त्यानंतर आरोपींनी रसाळ यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केली. यावेळी रसाळ यांचा मुलगा अजय आणि पुतण्या अजित यांनाही मारहाण करण्यात आली.
दोन्ही घटनांप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.