ढोकी : आरोपी नामे-बळीराम विष्णु सावंत, विष्णु लक्ष्मण सावंत, धीरज लक्ष्मण सावंत, अनिकेत बळीराम सावंत, किशोर बळीराम सावंत, मच्छिंद्र लक्ष्मण पवार, गोरख मच्छिंद्र पवार, अल्का विष्णु सावंत सर्व रा. जागजी ता. जि. धाराशिव यांनी दि. 29.06.2024 रोजी 13.00 ते 14.00 वा. सु. जागजी शिवारातील शेत गट नं 871 मध्ये फिर्यादी नामे- अविनाश पोपट सावंत, वय 35 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव यांना शेतात पावसाचे पाण्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे चुलते व चुलत भाउ हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश सावंत यांनी दि.30.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-समाधान अविनाश रसाळ, वय 28 वर्षे, रा. वेताळनगर तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 29.06.2024 रोजी 18.30 वा. सु. इदगा मैदान तुळजापूर येथे फिर्यादी नामे- गुलाम महमंद बशीर मनियार, वय 42 वर्षे, रा. वेताळनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन बॅटने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गुलाम मनियार यांनी दि.30.06.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.