धाराशिव- आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील राखीव जागासंदर्भात सरकारने चुकीचा आदेश काढल्याने गोरगरीबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे पोस्टर उलटे टांगून शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास (दादा) पाटील, मा.नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम शिवसैनिकांनी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सोमवार, 1 जुलै रोजी दिले. निवेदनात म्हटले की, आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसंदर्भात राज्य सरकारने चुकीचा आदेश काढला आहे. हा आदेश शिक्षण हक्कविरोधी असल्यामुळे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. तरीही सरकारने हा आदेश अद्याप मागे घेतला नसल्यामुळे 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे गोरगरीबांच्या लाखो पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खासगी शाळांतील राखीव जागांवरील प्रवेशाच्या अपेक्षेने लाखो पालकांनी अर्ज भरले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होऊन 15 दिवस झाले तरी राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया होऊ शकली नाही. सरकारच्या हेकेखोर वृत्तीमुळे अशा विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान प्रवेशासाठीची सोडत अद्याप काढण्यात आली नाही. त्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना आहे. मोफत प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून, याला शिक्षणमंत्री व राज्यातील महायुती सरकार जबाबदार आहे.
गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा व 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करावी आणि राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा थांबावावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राजाभाऊ पवार, बापू साळुंके, रवी वाघमारे, तुषार निंबाळकर, गणेश खोचरे प्रदीप मुंडे, प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, बंडू आदरकर, गणेश आसलेकर, सुरेश गवळी, विजय ढोणे, देवानंद एडके, सतीश लोंढे, नाना घाटगे, विष्णू यमपुरे, पंकज पडवळ, अजिंक्य राजेनिंबाळकर, पांडुरंग भोसले, हनुमंत देवकते, राम माने, अमित उंबरे, मनोज उंबरे, प्रसाद राजेनिंबाळकर, यशवंत शहापालक, वैजिनाथ पाटील, अक्षय खळदकर, कलीम कुरेशी, मुजीब काझी, अमित जगधने, नितीन राठोड, शिवप्रताप कोळी, चंद्रकांत गायकवाड, संदीप शिंदे, महेश लिमये, ओंकार बांगर, वैभव पाटील, नेताजी शेरकर, भैरव शेरकर, प्रभाकर राजेनिंबाळकर, सुधीर अलकुंटे, गफूर शेख, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, लक्ष्मण जाधव, प्रवीण पवार, बिलाल कुरेशी, गुड्डू शेख, महेंद्र शिंदे, अमोल वाघमोडे, दीपक नागरसोगे, अनिल चेंडके, ऋषी राऊत आदींची स्वाक्षरी आहे.