धाराशिव जिल्ह्यात टी-२२ वाघाचा हंगामा तीन महिने झाला, तरी संपत नाही.
वन विभागाच्या कामगिरीवर संतप्त झालेले मनोज जाधव यांनी गाढव भेट देण्याचा निर्णय घेतला होता. पण आता जिल्हाधिकारी आणि वन अधिकाऱ्यांनी अजून एक महिन्याची मुदत मागितली आहे.
⏳ ‘गाढव भेट’चे डेडलाइन – २० एप्रिल!
➡ मनोज जाधव यांचा इशारा –
- २० एप्रिलपर्यंत वाघ न पकडल्यास कोणत्याही दिवशी न सांगता गाढव भेट देणार!
- यावेळी गाढव भेट थेट जिल्हाधिकारी मार्फत वन मंत्र्यांना पोहोचवणार!
🐾 वाघ अजूनही “स्वतंत्र” – पण वन विभागाचा शोध चालूच!
➡ डार्ट गनचा त्रिवार फेल प्रयोग!
➡ 30 लाखांचा महोत्सव – जेवण, इंधन आणि फिरस्तीवर खर्च!
➡ वन अधिकाऱ्यांना अजूनही वाघ पकडायचा नवा प्लॅन सुचत नाही!
🤣 वाघ पकडायचा का गाढव भेट द्यायचं – ‘वन विभागाचा सस्पेन्स’!
➡ वाघ पकडायला आणलेल्या टीमला बिबट्या पकडण्याचा अनुभव – मग वाघ कसा सापडणार?
➡ वन विभागाला अजूनही ‘टी-२२’ च्या ट्रॅकिंगसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही!
➡ २० एप्रिलनंतर गाढव भेट घेण्याचा “समारंभ” थाटात साजरा होणार का?
🚨 आता धाराशिवकरांची एकच मागणी – ‘गाढव भेट नको, वाघ पकडा!’
🚨 वन विभागाने दिलेल्या आणखी एका महिन्यात काही फरक पडतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!