• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

डॉ. मुल्लाचे भंगार नंतर आता मंडपप्रकरण: लाखोंचा खर्च, मोजून १० रुग्ण!

admin by admin
October 16, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
डॉ. मुल्लाचे भंगार नंतर आता मंडपप्रकरण: लाखोंचा खर्च, मोजून १० रुग्ण!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुल्ला हे भंगार घोटाळ्याच्या गंमतीनंतर आता नव्या पराक्रमात रंगले आहेत. नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. मुल्ला महिन्यातून पंधरा दिवस धाराशिवलाच असतात. नळदुर्गकडे त्यांचं लक्ष असलं तर ठीक, पण त्यांचं शरीर मात्र फार कमी वेळा तिथे प्रकट होतं. रुग्णालयाचा सगळा कारभार आता प्रभारी डॉक्टरवर चालतोय, तर डॉ. मुल्ला धाराशिवला आराम करीत आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तुळजापुरातील नळदुर्ग रोडवर महाआरोग्य शिबिराचा थाट मांडला गेला. मंडप उभारण्यासाठी लाखो रुपये खर्चून थोडा नव्हे, तर १० हजार रुग्णांसाठी जागा ठेवली होती! पण आले किती रुग्ण? मोजून १० ते २०! मंडप मोकळा तर पैसा संपला, पण रुग्ण गायब. आता काय करणार? नवव्या दिवशी मंडप उचलून नेला. शासनाचा पैसा वाटला शेवटी व्यर्थ!

या शिबिराचा मोठा फज्जा तर उडालाच, पण जेव्हा लोकांना खरंच मंडपाची गरज होती, तेव्हा मंडपच गायब! कोजागिरी पौर्णिमेला कर्नाटकातील लोक नळदुर्गमार्गे चालत तुळजापूरच्या दिशेनं जातात. असा योग्य वेळ साधून मंडप लावायला हवा होता, पण तोवर मंडप केव्हाच काढून ठेवलेला!

संपूर्ण घटना पाहता, ‘महाआरोग्य शिबीर’ या नावाखाली एका अदृश्य कारभारानं सरकारी पैसे खर्चवून मंडपाच्या नावाखाली कोणी कमाई केली, हे सांगायला वेगळं काही सांगावं लागणार नाही. आता लोकांना ‘मंडप’ आणि ‘महाआरोग्य’ यांचा काही संबंध आहे का, हे समजण्याचंही प्रयोजन उरलेलं नाही!

Previous Post

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘भंगार घोटाळा” !

Next Post

मुख्यमंत्री कोण, हे निवडून आल्यावरच ठरेल – तुर्तास फक्त ‘टोलवाटोलवीचा’ उत्सव!

Next Post
मुख्यमंत्री कोण, हे निवडून आल्यावरच ठरेल – तुर्तास फक्त ‘टोलवाटोलवीचा’ उत्सव!

मुख्यमंत्री कोण, हे निवडून आल्यावरच ठरेल - तुर्तास फक्त 'टोलवाटोलवीचा' उत्सव!

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!

August 12, 2026
खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

August 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 12, 2026

Recent Posts

  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
  • झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!
  • खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!