मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिवचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी ई-पिक पाहणी प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणींवरून सरकारला धारेवर धरले. ई-पिक पाहणी सक्तीमुळे अनेक शेतकरी, विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक, अनुदानापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली.
या प्रश्नाला महसूल व ग्रामीण विकास राज्यमंत्री योगेश कदम यांचे उत्तर समाधानकारक न ठरल्याने वातावरण तापले. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला प्रतिप्रश्न करत अधिक स्पष्ट उत्तर देण्याची मागणी केली. या गोंधळानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत उत्तर दिले.
सुमारे १३ मिनिटे चाललेल्या या चर्चेत ई-पिक पाहणीच्या तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हिडीओ पाहा