• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात अपघातांचे सत्र; तुळजापूर, येडशी आणि लोहाऱ्यात ४ जणांचा मृत्यू

admin by admin
December 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळ्या चार घटनांमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तुळजापूर, येडशी (धाराशिव ग्रामीण) आणि लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. तुळजापूर बायपासवर पिकअप आणि ट्रॅक्टरचा अपघात; राजस्थानी तरुणाचा मृत्यू

तुळजापूर ते लातूर जाणाऱ्या बायपास रोडवरील काक्रंबा चौकाजवळ मंगळवारी (दि. २३) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील काही नागरिक पिकअप (क्र. एमएच २५ एजे २३१५) मधून प्रवास करत होते. पिकअप चालक आरोपी हरीशकुमार दलारामजी लोहीया याने वाहन निष्काळजीपणे चालवून समोर जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली.

या भीषण अपघातात निर्मलकुमार शेराराम लोहिया (वय २७, रा. बागथल, राजस्थान) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर चालक हरीशकुमार लोहीया, मैनदर पुनर व पारस पुनर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गगनकुमार शेराराम लोहीया यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. तुळजापुरात कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत, तुळजापूरजवळील लहान तीर्थाच्या पुढे वेरना कारने (क्र. टीएस १० ईएस २२१९) दुचाकीला (क्र. एमएच २५ बीबी ९७०५) समोरून जोराची धडक दिली. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार ओंकार पप्पु मुळुक (वय २४, रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मयताचा भाऊ अजित पप्पु मुळुक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३. येडशी घाटात एसटी बसची दुचाकीला धडक; वृद्धाचा मृत्यू

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येडशी घाटातील म्हसोबा मंदिराजवळ मंगळवारी (दि. २३) सकाळी ११.२० वाजता अपघात झाला. रोहा आगारच्या एसटी बसने (क्र. एमएच १४ एमएच ०१९८) दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार दिलीप गोविंद जाधव (वय ७०, रा. शिराळे, ता. बार्शी) यांचा मृत्यू झाला.

एसटी बस चालक सुर्यकांत गोविंद कलवले (वय ३८, रा. आटोळा, ता. चाकूर) याने हयगयीने बस चालवून अपघात केल्याची फिर्याद बप्पा उत्तम अनपट यांनी दिली आहे. यावरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

४. लोहाऱ्यात ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

लोहारा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, समुद्राळ येथे ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली होती, मात्र याचा गुन्हा २३ डिसेंबर रोजी दाखल झाला आहे.

भिमाशंकर अंकुश नेलवाडे (वय २६, रा. कोंडजीगड, ता. लोहारा) असे मयताचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच २५ एयु ११४५) जात असताना ट्रॅक्टर (क्र. एमएच २५ एएल ४६४१) चालक नेताजी खेमा राठोड याने त्यांना समोरून धडक दिली. याप्रकरणी अंकुश नेलवाडे यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Previous Post

“उंट बसला तरी गाढवापेक्षा उंचच!” धाराशिवमध्ये भाजपच्या ‘त्या’ पोस्टरला श्वेता दुरुगकर यांचे सणसणीत उत्तर

Next Post

पाथरुडमध्ये घराच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पाथरुडमध्ये घराच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group