धाराशिव – जिल्ह्यातील अंबी आणि लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि मोटर चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
अंबी – चिंचपूर खुर्द येथील सोनबा शहाजी गरड यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४०,००० रुपये रोख असा एकूण २,९२,००० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना ४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११ ते पहाटे १:४५ या वेळेत घडली. अंबी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३३१(३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
लोहारा – माळेगाव येथील चंद्रकांत प्रभु पवार यांच्या दुकानासमोर ठेवलेली अंदाजे १५,००० रुपये किमतीची ७.५ एचपीची पानबुडी मोटर २ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे १:५५ वाजता चोरीला गेली. लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस या दोन्ही घटनांचा तपास करत आहेत. नागरिकांनी आपल्या घरांची आणि मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.